तडजोडीच्या ‘राज’कारणाचा एसटी संपात प्रवेश!

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तडजोडीच्या ‘राज’कारणाचा एसटी संपात प्रवेश!

     सन २०१४ मध्ये देशासह महाराष्ट्राच्या राजकारणात जो मुलभूत बदल घडवून आणण्यात ‌‌‌आर‌एस‌एस ला जे यश मिळाले त्याचे दृश्य स्वरूप साधारण

पोलिसांच्या गाडीने चौघांना चिरडले; एकाचा मृत्यू
गोदामाई प्रतिष्ठानचा उपक्रम प्रेरणादायी ः कपाळे
सत्ता संघर्षात संबंधामुळे कोणीच बोलायला व वाईटपणा घ्यायला तयार नाही : खासदार डॉ.सुजय विखे.

     सन २०१४ मध्ये देशासह महाराष्ट्राच्या राजकारणात जो मुलभूत बदल घडवून आणण्यात ‌‌‌आर‌एस‌एस ला जे यश मिळाले त्याचे दृश्य स्वरूप साधारणपणे सत्ताधारी आणि विपक्ष असे दोन्ही गट हिंदूत्ववादी असणे आणि त्याच बरोबर तिसरी राजकीय शक्ती देखील हिंदूत्ववादी असणे असे चित्र दिसून येते. संघाचे दीर्घकालीन डावपेच आणि मोदी-शहांचे सत्ताकारणाचे डावपेच यातून शिवसेना सत्ताधारी झाली. वरकरणी काॅंग्रेस-राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि शिवसेना अशा तीन पक्षांची महाआघाडी जरी दिसत असली तरी त्यामागे अनेक गणितांची जुळवणी आहे. महाराष्ट्रात प्रथमच हिंदुत्ववादी म्हणवणारा भाजपचा विरोधी पक्षनेता, हिंदुत्ववादी म्हणवून घेणाऱ्या शिवसेनेचे मुख्यमंत्री आणि या सत्ताकारणाभोवती असणाऱ्या सत्ताधारी आणि विरोधी पक्षाला बॅलन्स करणारी तिसरी राजकीय शक्ती म्हणजे मनसे! त्यामुळे हिंदुत्ववादी म्हणवणाऱ्या मनसे नेत्यांकडे एसटी संपाचे नेतृत्व देणे या घडामोडी घडून येताहेत. या राजकारणात राष्ट्रवादी देखील जुळवून घेते. तसे तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अनेक नेते भिडे भक्त आहेतच. असो. आपला मुख्य विषय आतापर्यंत केलेली चर्चा हा नसून एसटी संपात राज ठाकरेंचे नेतृत्व पुढे येणे हा आहे. तसे पाहता राज ठाकरे यांनी केलेले कोणतेही आंदोलन हे निर्णायक पातळीवर कधी गेल्याचा इतिहास नाही. मुंबईत मराठी टक्का असो वा मराठी फलकांचा प्रश्न असो हे दोन्ही आंदोलन कोणत्याही निर्णायकतेशिवाय गुंडाळली गेली. त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला टोलमुक्त करण्यासाठी उभे केलेले आंदोलन कधी फुस्स… झाले हे कळले देखील नाही! निवडणुकीच्या काळात भाजपविरोधात व विशेषत: फडणवीस विरोधात लावरे तो व्हिडिओ…. या वाक्यांनी धम्माल उडवून देताना (अर्थात राष्ट्रवादीच्या मदतीने) राज ठाकरे यांना काहीशी लोकांची दाद मिळाली परंतु मते नाही. राज ठाकरे यांचा निर्णायक लढ्याचा इतिहास नसताना त्यांच्याकडे एसटी संपाचे नेतृत्व जाणे ही बाब एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या अपयशावर शिक्कामोर्तब करण्यासारखेच आहे. यासंदर्भात दोन बाबी महत्त्वाच्या  पहिली भाजप या संपात संपकरी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून जी महामंडळाच्या विलीनीकरणाची मागणी करित आहे, ती त्यांच्या राजकीय चरित्राशी विसंगत आहे. ही विसंगती लक्षात आल्याने ते आंदोलनातून बाहेर पडण्याच्या भूमिकेत आले. दुसरी बाब एसटी हे महामंडळ असल्याने त्याच्या मालमत्तांची विल्हेवाट सरकारीकरण केले गेले तर भाजप समर्थित भांडवलदारांना  सरकार मार्फतच मालमत्ता विकणे सोपे होते. महामंडळामुळे यात द्विपक्षीय अधिकार असतात. सरकार आणि महामंडळ. त्यात हस्तक्षेप जिकीरीचा होतो, हे भाजपला पुरते ठाऊक आहे. त्यामुळे महामंडळाचे सरकारीकरण करून विक्री सोपी होईल हा त्यांचा कयास. पण यात जनतेची सेवा करणारे असलेले एसटी महामंडळ आपल्यामुळे मोडीत निघाले हा आरोपही त्यांना नको आहे! यासर्व कारणपरत्वे त्यांनी जाणीवपूर्वक राज ठाकरेंना या संपाच्या नेतृत्वपदावर आणण्यासाठी राज-कारण केले.       महाराष्ट्रात फुले-आंबेडकरी चळवळ आणि राजकारणाचा दीर्घकाळ निर्णायक इतिहास आहे. या चळवळींना राजकीय यश फार मिळाले नसले तरी त्यांच्या सामाजिक आंदोलनाचा इतिहास निर्णायक यशस्वी आहे. अर्थात सध्या या विचारांचे पक्ष-संघटन दुबळे झालेले दिसते. तर काहींनी मंदिर आंदोलन आणि अन्य प्रयोग करित अवैदिक हिंदूत्व राजकीयदृष्ट्या स्विकारल्याचे दिसून येते. त्यामुळे सर्वंकष हिंदुत्त्वाच्या या वातावरणात एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी हिंदूत्ववादी आणि निर्णायकी नसलेल्या तडजोडवादी नेत्याला नेतृत्व देणे हे आश्चर्यकारक आहे. कारण हिंदूत्ववादाच्या नावाखाली उच्चजातीय भांडवलदारांना सार्वजनिक मालमत्ता विकणे हाच उद्देश त्यांचा असल्याने एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या पायावरच धोंडा मारून घेण्याचा प्रकार यानिमित्ताने उभा ठाकला आहे! त्यामुळे आता निर्णायकपणे हे ठरवण्याची वेळ आली की, एसटी कर्मचाऱ्यांनो तुम्हाला हिंदूत्व हवे असेल तर तुमच्या मुलाबाळांचे भविष्य तुम्हीच उध्वस्त करताहात, असे नाईलाजाने म्हणावे लागेल! सार्वजनिक उद्योगांना सुरक्षित राखायचे असेल तर फुले-शाहू-आंबेडकरी विचारांना पर्याय नाही! यासाठी प्रसंगी आम्ही तुमच्यासाठी लढ्यात उतरू!

COMMENTS