ढवळपुरी आश्रमशाळेच्या खेळाडूंची दिल्लीतही विजयी पताका.

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ढवळपुरी आश्रमशाळेच्या खेळाडूंची दिल्लीतही विजयी पताका.

भाळवणी (प्रतिनिधी):-आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती संलग्न युथ गेम्स फेडरेशन ऑफ इंडिया आयोजित युथ गेम्स ऑल इंडिया नॅशनल चॅम्पियनशिप २०२१ मध्ये पारने

अहमदनगर जिल्ह्यात आज अतिवृष्टीचा इशारा
आंबिल ओढा परिसरात मनपाची अतिक्रमण घरावर मोठी कारवाई l पहा LokNews24
महिलेच्या पर्समधील सव्वा लाख पळवले

भाळवणी (प्रतिनिधी):-
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती संलग्न युथ गेम्स फेडरेशन ऑफ इंडिया आयोजित युथ गेम्स ऑल इंडिया नॅशनल चॅम्पियनशिप २०२१ मध्ये पारनेर तालुक्यातील ढवळपुरी येथील आश्रमशाळेच्या भानुदास भिमा बिचकुले व बाळू खंडू करगळ या खेळाडूंनी घवघवीत यश मिळवीत दिल्लीतही आपली विजयी पताका फडकवली.

देशाची राजधानी दिल्ली येथे २८ ऑगस्ट ते ३० ऑगस्ट दरम्यान आयोजित या स्पर्धेत भानुदास बिचकुले याने १७ वर्षे वयोगटात तीन किलोमीटर धावण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवित सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले तर बाळू करगळ याने १९ वर्ष वयोगटात तीन किलो मीटर धावणे स्पर्धेत दुसरा क्रमांक मिळवित रौप्यपदक पटकावले. भटक्या विमुक्त जाती जमातीतील मेंढपाळ समाजातील हे विद्यार्थी मागील सहा वर्षांपासून ढवळपुरीच्या आश्रमशाळेत शिक्षक लतिफ राजे व राधुजी चौधरी यांच्या मार्गदर्शनात शालेय क्रिडा स्पर्धा, विविध मॅरेथॉन स्पर्धा, क्रॉसकंट्री स्पर्धेत सहभागी होऊन यशस्वी होत आहे. प्राथमिक आश्रमशाळेचे मुख्याध्यापक संदिप महांडुळे, माध्यमिक आश्रमशाळेचे मुख्याध्यापक बापूसाहेब रुपनर शिक्षक लतिफ राजे, वसंत काळे, राजाराम वाघ, संतोष पट्टेकर, प्रशांत पादीर, मनिषा गर्जे, रशिदा तांबोळी, अधिक्षक आप्पासाहेब पवार, महेंद्र वाबळे, प्रविणकुमार गुंजाळ, संजय थोरात, बाबासाहेब फंड, मनोज देवकाते, योगेश भुसारी आदी व सर्व शिक्षकांनी या दोन्ही खेळाडूंचे अभिनंदन करीत त्यांचा गौरव केला.

या खेळाडूंच्या यशाचे पारनेरचे आमदार निलेश लंके, समाजकल्याण सहाय्यक आयुक्त राधाकिसन देवढे, धन्वंतरी मेडिकल अँण्ड एज्युकेशनल फौंडेशनचे अध्यक्ष शाहिद काझी, सचिव रेहान काझी, आत्मा समितीचे अध्यक्ष राहुल झावरे, ढवळपुरीचे सरपंच डॉ. राजेश भनगडे, उपसरपंच डॉ. संतराम कुटे, माजी सरपंच बबनराव पवार सर, सेवा सोसायटीचे चेअरमन भागाजी गावडे, चेअरमन सुखदेव चितळकर तसेच पालक, शिक्षक व ग्रामस्थ यांनी त्यांचे अभिनंदन केले.

COMMENTS