ड्रीम्स मॉल आगीचा चौकशी अहवाल सादर करण्यासाठी 15 दिवसांची मुदत

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ड्रीम्स मॉल आगीचा चौकशी अहवाल सादर करण्यासाठी 15 दिवसांची मुदत

भांडुप येथील ड्रीम्स मॉलमध्ये लागलेल्या आगीची महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी गंभीर दखल घेतली आहे.

बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी हॉल तिकीट आजपासून ऑनलाईन उपलब्ध होणार
विनयभंगप्रकरणी आरोपीला तीन वर्षे कारावास 
उत्तरप्रदेशात रविवारी मंत्रिमंडळाचा विस्तार

मुंबई/प्रतिनिधी: भांडुप येथील ड्रीम्स मॉलमध्ये लागलेल्या आगीची महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी या घटनेची चौकशी करून येत्या 15 दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. चहल यांनी उपायुक्त (आपत्ती व्यवस्थापन) प्रभात रहांगदळे यांना या चौकशीचे आदेश दिले आहेत. 

या घटनेची तसेच त्यातील आगीच्या कारणांबाबत सर्वंकष चौकशी करण्याचे आणि त्याचा अहवाल पुढील पंधरा दिवसात सादर करण्यात यावा, असे या आदेशात म्हटले आहे. ड्रीम्स मॉल घटनेतील आगीचे नेमके कारण काय, त्याबाबत प्रमुख अग्निशमन अधिकारी यांच्यासोबत सल्लामसलत करून कारणांची स्पष्टता करणे, मॉल तसेच त्यातील सनराईज रुग्णालयाला आवश्यक त्या सर्व परवानगी/अनुज्ञप्ती देण्यात आल्या होत्या का, त्याची पडताळणी करून, दिलेल्या नसल्याचे आढळल्यास संबंधित अधिकार्‍यांवर जबाबदारी निश्‍चित करणे, अग्निसुरक्षा पालनाबाबतच्या उपाययोजना करण्यात मॉलचे मालक/व्यवस्थापन तसेच रुग्णालयाचे मालक/व्यवस्थापन यांच्याकडून काही त्रुटी राहिल्या होत्या का, ते शोधून काढणे, अग्निशमन कार्यात काही त्रुटी होत्या का, त्याची कारणे शोधून काढणे, या घटनेच्या अनुषंगाने, इतर काही संदर्भित मुद्दे असल्यास ते आणि भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होवू नये म्हणून योग्य त्या शिफारशी करणे या मुद्यांवर चौकशी होणार आहे.

COMMENTS