केसांचे आरोग्य सुधारण्यासाठी आपण अनेक प्रयत्न करत असतो. औषधांचा वापर करत असतो तर काही वेळेस औषधांचा वापर करत असतो. तरीदेखील केस गळतीची समस्या आपल्याल
केसांचे आरोग्य सुधारण्यासाठी आपण अनेक प्रयत्न करत असतो. औषधांचा वापर करत असतो तर काही वेळेस औषधांचा वापर करत असतो. तरीदेखील केस गळतीची समस्या आपल्याला सारखी सतावत असते. यासाठी आपण काही नैसर्गिक पदार्थांचा वापर करुन केस गळतीची समस्या रोखू शकतो तसेच, केसांना अधिक मजबूतही करु शकतो. जास्वंदीच्या फुला(Jasmine flowers)चा व पानांचा वापर करुन आपण केसांची काळजी घेऊ शकतो. आयुर्वेदात जास्वंदीला विशेष महत्त्व प्राप्त आहे. याचा केसांना कसा फायदा होतो हे जाणून घेऊया.
१. आपले केस रुक्ष(Ruksha) झाले असतील व त्याची वाढ थांबली असेल तर जास्वंदीच्या फुलांचा वापर आपण करु शकतो. यांत असणारे घटक केसांच्या पोषक तत्वासाठी चांगले असतात. तसेच केसांचा कोरडेपणा(Hair dryness) देखील दूर होतो.
२. प्रदूषणामुळे बहुतेक लोकांच्या केसांमध्ये कोंडा(Konda) निर्माण होतो. तसेच केसांच्या अनेक तक्रारी निर्माण होतात. जास्वंदीचे तेल(Jaswant oil) केसांना लावल्यास कोंड्याची समस्या कमी होण्यास मदत होईल.
३. केस अकाली पांढरे होत असतील तर जास्वंदीच्या तेलाचा त्यासाठी फायदा होऊ शकतो. जास्वंदीच्या फुलात अँटिऑक्सिडंट्स,(Antioxidants) जीवनसत्त्वे(Vitamins) आणि मेलेनिन(Melanin) नावाचे घटक असतात, जे केसांना नैसर्गिकरित्या रंग देण्यास मदत करतात.
४. आजकाल केसगळतीची समस्या ही अधिक वाढत आहे. त्यामुळे केसांना टक्कल पडणे सातत्याने वाढत आहे. ही समस्या रोखण्यासाठी जास्वंदच्या फुलांचा केसांसाठी फायदा होऊ शकतो. जास्वंदीच्या फुलांचा व पानांचा हेअर मास्क बनवून केसांना लावल्यास फायदा होईल.
COMMENTS