डाँ.तनपुरे कामगारांसाठी ‘प्रहार’ स्टाईलने आंदोलन

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

डाँ.तनपुरे कामगारांसाठी ‘प्रहार’ स्टाईलने आंदोलन

देवळाली प्रवरा /प्रतिनिधीडाँ.तनपुरे कारखान्याचे कामगार गेल्या तेरा दिवसा पासुन आपल्या न्याय हक्कासाठी लढा देत आहे. कामगारांची ग्र्याजुटी व भव

ग्राहक संरक्षण संस्थेचे आमकर यांनी अकोल्यात घेतला आढावा
ताहराबादमध्ये घराचे कुलूप तोडून दागिने चोरीला
भविष्यात पर्यटन क्षेत्रात मोठी संधी- किशोर मरकड 

देवळाली प्रवरा /प्रतिनिधी
डाँ.तनपुरे कारखान्याचे कामगार गेल्या तेरा दिवसा पासुन आपल्या न्याय हक्कासाठी लढा देत आहे. कामगारांची ग्र्याजुटी व भविष्य निर्वाह निधी भरला गेला नाही. तर सरकारी अधिकारी इतर ठिकाणी मालमत्ते टाच आणतात. याच कारखान्यातील कामगारांसाठीदुजा भावाची वागणूक का? ग्र्याजुटी व भविष्य निर्वाह निधी साठी सरकारी अधिकाऱ्यांनी टाच का आणली नाही.दोन दिवसात सरकारी अधिकारी यांनी कारवाई न केल्यास ‘प्रहार’ स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा प्रहार चे जिल्हाध्यक्ष विनोदसिंह परदेशी यांनी दिला आहे.


राहुरी फँक्टरी येथे कारखान्याचे कामगार गेल्या तेरा दिवसा पासून आंदोलन छेडीत आहे.परंतू आंदोलकांची कोणी हि दखल घेत नाही.’प्रहार’चे जिल्हाध्यक्ष परदेशी यांच्या विविध संघटनांनी आंदोलकांची भेट घेऊन कामगारांच्या व्यथा जाणून घेतल्या.त्यानंतर पञकारांशी बोलताना परदेशी म्हणाले की, गेल्या तेरा दिवसा पासुन कामगार आंदोलन करीत आहे.परंतू कोणत्याही शासकीय आधिकाऱ्याने दखल घेतली नाही.कारखान्यचे सर्वेसर्वा खा.डाँ सुजय विखे यांनी कामगारांचा प्रश्न तातडीने सोडविला पाहिजे होता.जिल्ह्यातील लोक आपल्याकडे न्याय मागतात.

राहुरी तालुक्यातील कामगार आंदोलन करतात तुम्ही दुर्लक्ष करीत आहात.राज्यमंञी बच्चुभाऊ कडू यांच्या कानावर हा प्रश्न घातला आहे.मंगळवार पासुन ना.बच्चुभाऊ व आम्ही सरकारी अधिकाऱ्यांनी कामगारांकडे दुर्लक्ष का केले.प्रश्न का सोडवला नाही. इतर कारखान्या प्रमाणे या कारखान्याच्या कामगारांची ग्र्याजुटी व भविष्य निर्वाह निधी साठी मालमत्तेवर टाच का आणली नाही.थकीत भविष्य निर्वाह निधी व ग्र्याजुटी वसुली न करणाऱ्या अधिकाऱ्यांस निलंबित करण्या पर्यंत आंदोलन करण्याचा इशारा यावेळी दिला. या कामगारांच्या मागे आता राज्यमंञी बच्चुभाऊ कडू यांची ‘प्रहार’ संघटना उतरली आहे.कामगारांवर खोटे गुन्हे दाखल करण्याकडे प्रहार संघटना आता लक्ष देणार आहे.असे परदेशी यांनी सांगितले.


यावेळी प्रहारचे जिल्हाउपाध्यक्ष देविदास येवले,नितीन पानसरे,रामजी शिंदे,प्रशांत पवार,मधुकर घाडगे,सुरेश लांबे,बापूसाहेब पटारे,लहानु तमनर, छावा संघटनेचे विश्वनाथ वाघ आदींसह विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

COMMENTS