ठाण्यातील आरोग्यसेवेसाठी अडीच कोटी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ठाण्यातील आरोग्यसेवेसाठी अडीच कोटी

ठाणे जिल्ह्यातील सार्वजनिक आरोग्य सेवेच्या सक्षमीकरणासाठी ज्येष्ठ पत्रकार खासदार कुमार केतकर यांनी स्थानिक विकास निधीतून अडीच कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहेत.

महाविद्यालयांच्या संख्येपेक्षा गुणात्मक दर्जा वाढविणे महत्वाचे – डॉ. नितीन करमाळकर
पाथर्डीत महंत रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ निर्दशने
कराड शहरात काही तासात 4 टन कचरा गोळा

ठाणे / प्रतिनिधीः ठाणे जिल्ह्यातील सार्वजनिक आरोग्य सेवेच्या सक्षमीकरणासाठी ज्येष्ठ पत्रकार खासदार कुमार केतकर यांनी स्थानिक विकास निधीतून अडीच कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहेत. जिल्ह्यातील ग्रामीण भागांतील दहा रुग्णालयांना त्याचा लाभ होणार आहे. जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्याकडे केतकर यांनी त्यासंबंधीची पत्रे सुपूर्द केली. 

    ठाणे जिल्ह्यातील सार्वजनिक आरोग्यसेवा अत्यंत अपुरी आहे. कोरोना संसर्ग काळात त्याची प्रकर्षाने जाणीव झाली. शासकीय रुग्णालयांची दुरवस्था हे त्याचे एक महत्त्वाचे कारण आहे. व्यवस्था अतिशय तुटपुंजी असूनही कोरोना संकटकाळात शासकीय यंत्रणेने उत्तम कामगिरी केली. ठाण्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयाने या कसोटीच्या काळात कोरोना रुग्णांना दिलासा दिला. मध्यंतरी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार यांच्याकडून खासदार केतकरांकडे जिल्हा रुग्णालयातील सुविधांसाठी निधी मिळण्याविषयी विचारणा झाली. केतकर यांनी तत्काळ 25 लाख रुपये दिले. त्यानंतर आरोग्य उपसंचालक डॉ. गौरी राठोड आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी जिल्ह्यातील आरोग्य विभागांच्या गरजांविषयी सविस्तर प्रस्ताव तयार केला. पत्रकार संदीप आचार्य यांनी त्यासाठी पुढाकार घेतला. खासदार केतकर यांच्यासमोर हा प्रस्ताव मांडण्यात आला. त्यावर त्यांनी तातडीने स्थानिक विकास निधीतून अडीच कोटी रुपये देण्याची तयारी दाखवली. रीतसर प्रक्रिया पूर्ण करून अडीच कोटी रुपयांचा खासदारनिधी आरोग्य विभागाला देण्याबाबतची पत्रे केतकर यांनी जिल्हाधिकार्‍यांना दिली. याआधी खासदार केतकरांनी मुंबईतील वाडिया, सेंट जॉर्ज आणि कस्तुरबा या रुग्णालयांना 50 लाख रुपयांचा निधी दिला आहे. ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालय, उल्हासनगर येथील सेंट्रल हॉस्पिटल, अंबरनाथ येथील बी.जी. छाया रुग्णालय, मुरबाड तसेच टोकावडे येथील ग्रामीण रुग्णालय, ठाणे येथील प्रादेशिक मनोरुग्णालय, बदलापूर येथील ग्रामीण रुग्णालय, मीरा भाईंदर येथील भीमसेन जोशी रुग्णालय, भिवंडी येथील इंदिरा गांधी रुग्णालय आणि शहापूर येथील उप जिल्हा रुग्णालयांमध्ये आरोग्यविषयक सोयी सुविधा पुरविण्यासाठी या निधीचा विनियोग केला जाणार आहे.

COMMENTS