मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले, याविरोधात शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अशोक चव्हाण यांच्याविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे.
बीड/प्रतिनिधीः मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले, याविरोधात शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अशोक चव्हाण यांच्याविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे.
मेटे यांनी सांगितले, की पाच मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केले. यामुळे मराठा समाज खुल्या प्रवर्गात आला आहे. आरक्षण रद्द झाल्यानंतर आम्ही राज्य सरकारकडे मराठा समाजाला ईडब्ल्यूएस मध्ये आरक्षण द्यावे अशी मागणी केली होती. ज्यांना कोणतेही आरक्षण मिळत नाही अशा आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोकांसाठी कोणत्याही समाजाच्या लोकांसाठी दहा टक्के आरक्षण दिले आहे. यामध्ये मराठा समाजाला घेण्याची मागणी केली होती; मात्र आता 15-20 दिवस झाले यावर काहीच कार्यवाही झालेली नाही. यामुळे नाकर्तेपणाच्या विरोधात मी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केल्याचे मेटे म्हणाले. न्यायालयाला विनंती केली आहे, की आता नोकर्या, अॅडमिशन सुरू होत आहेत. यामुळे लवकरात लवकर यासंबंधी विचार करून ठाकरे, चव्हाण आणि राज्याचे सचिव यांना नोटिसा काढाव्यात असे या याचिकेत म्हटले आहे.
COMMENTS