टी-२० सामन्यात सुबोधने  १७ चेंडूत चोपल्या १०२ धावा

Homeमहाराष्ट्रमुंबई - ठाणे

टी-२० सामन्यात सुबोधने १७ चेंडूत चोपल्या १०२ धावा

मुंबई : दिल्लीकडून रणजी खेळणारा भारतीय क्रिकेटर सुबोध भाटी याने टी-२० क्रिकेटमध्ये इतिहास रचला. टी-२० क्लब क्रिकेट सामन्यात सुबोधने द्विशतक झळकावत आप

रोहित शर्माने लुटला होळीचा आनंद
दिल्लीच्या पराभवाने आरसीबी प्लेऑफमध्ये ; कर्णधार रिषभ पंत ठरला खलनायक !
इस्लामपुरात रंगणार 40 वर्षांवरील टेनिस बॉल क्रिकेट लिग

मुंबई : दिल्लीकडून रणजी खेळणारा भारतीय क्रिकेटर सुबोध भाटी याने टी-२० क्रिकेटमध्ये इतिहास रचला. टी-२० क्लब क्रिकेट सामन्यात सुबोधने द्विशतक झळकावत आपली छाप सोडली. सुबोधने दिल्ली इलेव्हनकडून खेळताना नाबाद २०५ धावांची तुफानी खेळी केली. यात १७ षटकार आणि १७ चौकारांचा समावेश आहे. सुबोधने २०५ धावांमधील १०२ धावा अवघ्या १७ चेंडूत चोपल्या. सुबोध सलामीला गेला आणि ७९ चेंडू खेळून नाबाद परतला. सुबोध टी-२० क्लब स्पर्धेत द्विशतक झळकावणारा पहिला क्रिकेटर ठरला आहे. दिल्ली इलेव्हन आणि सिम्बा संघ यांच्यात दिल्लीमध्ये सामना पार पडला. या सामन्यात सुबोधने तुफानी फटकेबाजी केली. त्याने विरोधी संघाच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेत मैदानाच्या चौफेर फटकेबाजी केली. यात त्याने २५० हून अधिक स्ट्राइट रेटने धावा केल्या. या कामगिरीसह सुबोध चर्चेत आला आहे.सुबोधच्या संघाने २० षटकांत एक गडी गमावत २५६ धावा केल्या. यापूर्वी सुबोधने दिल्ली संघासाठी देशांतर्गत स्पर्धेत महत्त्वपूर्ण खेळी खेळत अनेक सामने जिंकून दिले आहेत. दरम्यान, या खेळीमुळे सुबोधसाठी आयपीएलचे दरवाजे उघडतील का? हे पाहावे लागेल.

COMMENTS