Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

टीसीएस लंडन मॅरेथॉनमध्ये प्राची पवारने फडकविला तिरंगा

अहमदनगर : जगभर प्रतिष्ठेची समजली जाणारी टीसीएस लंडन मॅरेथॉन वयाच्या 46 व्या वर्षी पूर्ण करुन अहमदनगर जिल्ह्यातील प्राची संग्राम पवार यांनी ब्रिटन

राज्यावरील सर्व संकटे दूर होऊ दे ! :आमदार थोरात यांचे श्री गणेशाला साकडे
घरगुती गॅस ग्राहकांनी त्वरीत ई-केवायसी करून घ्यावे
शिवअमृत महाविद्यालयाची बारावीच्या उज्जवल निकालाची परंपरा कायम

अहमदनगर : जगभर प्रतिष्ठेची समजली जाणारी टीसीएस लंडन मॅरेथॉन वयाच्या 46 व्या वर्षी पूर्ण करुन अहमदनगर जिल्ह्यातील प्राची संग्राम पवार यांनी ब्रिटनच्या भुमीवर तिरंगा फडकविला. नुकत्याच टीसीएस लंडन मॅरेथॉनमध्ये यावर्षी प्राची पवार भारताचे प्रतिनिधीत्व करत सहभागी झाल्या होत्या. त्यांनी 4 तास 58 मिनिटात तब्बल 42.197 कि.मी. अंतर धावून शर्यत पूर्ण करणार्‍या त्या नगरमधील पहिल्या महिला ठरल्या आहेत. त्यांना एस.पी.जे. स्पोर्टस् क्लबचे संदिप जोशी यांचे मार्गदर्शन लाभले आहे. एक उद्योजिका, आई व गृहिणी अशा वेगवेगळ्या भुमिका निभवत असणार्‍या 46 वर्षीय प्राची पवार यांची ही नेत्रदीपक कामगिरी, सर्वच नगरकरांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहे. यापुर्वीही प्राची संग्राम पवार यांनी 2023 मध्ये  गोवा आयर्न मॅन 70.3 ही स्पर्धा पूर्ण केली आहे. यामध्ये अहमदनगर मधील त्या पहिल्या महिला होत्या. त्याचबरोबर 2023 मध्ये टाटा मुंबई मॅरेथॉन तसेच 2024 सालची स्पर्धा ही  त्यांनी पूर्ण केलेली आहे. विशेष म्हणजे अहमदनगरचा  भुईकोट किल्ला ते गुजरात स्टॅच्यू ऑफ युनिटी असे 550 किलोमीटर अंतर त्यांनी तीन दिवसात सायकलवर पूर्ण केले आहे. असे नवनवीन रेकॉर्ड त्यांच्या नावावर आहे.

COMMENTS