टाळेबंदीमुळे 40 हजार कोटींचे नुकसान

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

टाळेबंदीमुळे 40 हजार कोटींचे नुकसान

देशातील एकूण कोरोनाबाधितांत महाराष्ट्राती बाधितांचे प्रमाण साठ टक्क्यांहून अधिक आहे.

कुणी घेतेय आ. लंकेंची..तर कुणी देवरेंची बाजू; पारनेरच्या वादाचे राज्यभरात उमटले पडसाद
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर युवकाचा आत्मदहनाचा प्रयत्न
संवैधानिक पदावर जातीय मानसिकतेचे प्रदर्शन !

मुंबई/प्रतिनिधीः देशातील एकूण कोरोनाबाधितांत महाराष्ट्राती बाधितांचे प्रमाण साठ टक्क्यांहून अधिक आहे. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी महाराष्ट्र सरकारने लागू केलेल्या कठोर निर्बंधामुळे देशाचे 40 हजार कोटी रुपयांहूुन अधिक नुकसान होण्याची शक्यता आहे. 

महाराष्ट्रातील टाळेबंदीमुळे देशाचे 40 हजार कोटींचे नुकसान होऊ शकते. त्याचा सर्वात जास्त परिणाम व्यापार, हॉटेल आणि वाहतूक क्षेत्रांवर होईल. हा अंदाज केअर रेटिंग एजन्सीने व्यक्त केला आहे. आर्थिक क्रियाकलापात 0.32% घट होईल, असा अंदाज रेटिंग एजन्सी केअरने व्यक्त केला आहे. एका आठवड्यापूर्वी,या पतमापन संस्थेने आपला जीडीपी अंदाज 10.7 ते 10.9 टक्क्यांपर्यंत खाली आणला. पूर्वी तोच अंदाज 11 ते 12 टक्के व्यक्त करण्यात आला होता. देशातील एकूण कोरोना रूग्णांपैकी एकट्या महाराष्ट्रात 62 टक्के रुग्ण आहेत. सोमवारी येथे 57 हजारांहून अधिक रुग्ण आढळले. राज्यात कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता राज्य सरकारने अंशतः टाळेबंदीची घोषणा केली. निर्बंध कठोर केले. त्याअंतर्गत रात्री आणि शुक्रवारी रात्री ते सोमवारी पहाटे संपूर्ण बंद पाळण्यात येणार आहे. या अंतर्गत केवळ मर्यादित संख्येच्या कामांना मान्यता देण्यात आली आहे. हे निर्बंध या महिन्याच्या शेवटपर्यंत राहतील. चालू आर्थिक वर्षात टाळेबंदी जाहीर करणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य नाही. याआधीही बर्‍याच राज्यांत अंशतः टाळेबंदी जाहीर झाली आहे. त्यात मध्य प्रदेश, गुजरातसह अनेक राज्ये आहेत. याचा परिणाम उत्पादनावर व खर्चावर होईल, असे मत केअर या पतमापन संस्थेने व्यक्त केले आहे. या आर्थिक वर्षात राष्ट्रीय स्तरावर एकूण 137.8 लाख कोटी रुपयांचे सकल मूल्य जमा करण्यात आले आहे. त्यात महाराष्ट्राचे योगदान 20.7 लाख कोटी रुपये आहे. टाळेबंदीमुळे महाराष्ट्राचे सुमारे 2 टक्के नुकसान होईल. ही तूट महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या क्षेत्रात असेल. एका महिन्याच्या टाळेबंदीचा मोठा परिणाम होईल. व्यापार, हॉटेल आणि वाहतूक अधिक तोट्यात जाईल. त्यांचे सुमारे 15 हजार 722 कोटी रुपयांचे नुकसान होईल. आर्थिक आणि भूसंपत्ती क्षेत्रावरही याचा परिणाम होईल. त्याचप्रमाणे आर्थिक सेवा, रिअल इस्टेट आणि व्यावसायिक सेवांवरही परिणाम होईल. या सर्वांचे नऊ हजार 885 कोटी रुपयांचे नुकसान होईल. सार्वजनिक प्रशासनाचे आठ हजार 192 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. 

COMMENTS