झोपलेल्या चालकाला मारहाण करून गाडी व पैसे पळवले

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

झोपलेल्या चालकाला मारहाण करून गाडी व पैसे पळवले

अहमदनगर/प्रतिनिधी- रस्त्याच्या कडेला कार उभी करून कारमधील झोपलेल्या कार चालकास मोटारसायकलवरून आलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी दमदाटी व मारहाण करून त्या

पिपल्स रिपब्लिकन पार्टीचा प्रा.जोगेंद्र कवाडे यांच्या उपस्थितीत 15 रोजी जिल्हा मेळावा
अनैतिक संबंधाच्या संशयावरून पतीने केला पत्नीचा खून..
घोगरगाव वीज सबस्टेशनला मंजुरी; नामदार तनपुरे यांनी दिले आदेश

अहमदनगर/प्रतिनिधी- रस्त्याच्या कडेला कार उभी करून कारमधील झोपलेल्या कार चालकास मोटारसायकलवरून आलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी दमदाटी व मारहाण करून त्याच्याकडील चार हजार रुपये व त्याची दोन लाख रुपये किमतीची हुंडाई कार बळजबरीने चोरुन नेली. ही घटना नगर-पुणे रोडवरील कायनेटिक चौक येथे बुधवारी (दिनांक 21) पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास घडली.

याबाबतची अधिक माहिती अशी की सचिन बालाजी लेंडचे (वय 24, राहणार चक्रपाणी वसाहत, दुर्गामाता कॉलनी, भोसरी, पुणे) हे त्यांची हुंडाई कार (क्रमांक एमएच 16 एफसी 39 54) मध्ये भाडे घेऊन नगरला आले असता त्यांनी भाडे नगरमध्ये सोडले. त्यानंतर त्यांना लगेच दुसरे भाडे मिळाले व ते त्यांची वाट पाहत नगर-पुणे रोडवरील कायनेटिक चौकातील ब्रीज जवळ कार उभी करून कारमध्ये झोपले असताना पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी गाडीची काच वाजवून त्यांना उठवले. इथे पार्किंग आहे का? येथे गाडी कशाला उभी केली? अशी विचारणा केली व त्यातील एकजण गाडीच्या ड्रायव्हिंग सीटवर बसला तर दुसरा मागील सीटवर येऊन बसला आणि त्यांनी लेंडचे यांच्या खिशातील चार हजार रुपये व इंडियन बँक कोटक महिंद्रा कंपनीचे एटीएम कार्ड बळजबरीने हिसकावून काढून घेतले. त्यानंतर दोघांनी लिंडचे यांना त्यांच्या गाडीवर केडगाव इंडस्ट्रियल एरियामधील निर्मनुष्य रस्त्यावर नेऊन खाली उतरवले व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून त्यांची कार घेऊन चोरटे पसार झाले. याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी सचिन लेंडचे यांच्या फिर्यादीवरून जबरी चोरीच्या गुन्ह्याची नोंद केली. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक मनोज महाजन करीत आहेत.

COMMENTS