जैन कॉन्फरन्सच्या राष्ट्रीय प्रमुख मार्गदर्शकपदी अशोक (बाबूशेठ) बोरा यांची निवड

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जैन कॉन्फरन्सच्या राष्ट्रीय प्रमुख मार्गदर्शकपदी अशोक (बाबूशेठ) बोरा यांची निवड

नगर :  राष्ट्रसंत आचार्य सम्राट परमपूज्य आनंदऋषीजी म. सा., पूज्य आत्मयोगी आचार्य सम्राट प. पू. शिवमुनीची म. सा. यांच्या कृपेने अशोक (बाबुशेठ) बोरा

रेमडीसीवीर…काहींना कोटा सिस्टीमने तर काहींना सहज मिळतात
LOK News 24 I दखल*—————*रेखा जरे हत्याकांडाचा नगरच्या हनीट्रॅपशी संबंध ? l पहा LokNews24*
मनपाच्या स्थायी समितीच्या सभापतीना कैकाडी समाजाच्या वतीने निवेदन

नगर : 

राष्ट्रसंत आचार्य सम्राट परमपूज्य आनंदऋषीजी म. सा., पूज्य आत्मयोगी आचार्य सम्राट प. पू. शिवमुनीची म. सा. यांच्या कृपेने अशोक (बाबुशेठ) बोरा यांची अखिल भारतीय श्वेतांबर स्थानकवसी जैन कॉन्फरन्सच्या राष्ट्रीय प्रमुख मार्गदर्शकपदी निवड झाली आहे. जैन कॉन्फरन्सचे नवनिवार्चित राष्ट्रीय अध्यक्ष आनंदमलजी छल्लाणी (चेन्नई) यांनी ही निवड जाहीर करून बोरा यांना नियुक्ती पत्र पाठविले आहे.

या निवडीबद्दल अशोक (बाबुशेठ) बोरा यांच्यावर राष्ट्रीय स्तरावरुन विशेषतः महाराष्ट्र प्रांतातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अशोक (बाबुशेठ) बोरा ह्यांनी सन  1992 मध्ये अखिल भारतीय श्वेतांबर स्थानकवासी जैन कॉन्फरन्सचे राष्ट्रीय युवा अध्यक्ष म्हणून पाच वर्ष कार्यभार सांभाळला आहे. याकाळात त्यांनी त्यांनी धार्मिक व मानव सेवेच्या माध्यमातून राष्ट्रीय स्तरावर वेगळी छाप सोडली होती. तसेच 1998 मध्ये त्यांची राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून निवड झाली. सन 2016 मध्ये त्यांनी राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक लढविली होती. त्यावेळेस देखील त्यांना संपूर्ण भारतातून अभूतपूर्व असा मोठा प्रतिसाद मिळाला. परंतु महाराष्ट्रातून बोगस मतदान व अनेक गैरप्रकार झाल्याने त्यांना अत्यंत अल्प अशा मताने पराभवाला सामोरे जावे लागले. तरीदेखील त्यांनी जैन कॉन्फरन्सच्या सभासदांशी आपली नाळ व संबंध जोपासले. त्यामुळेच त्यांना या वेळी राष्ट्रीय प्रमुख मार्गदर्शकपदी नेमण्यात आले आहे. सदर बाब अहमदनगर शहराच्या दृष्टीने अभिमानाची बाब असून त्यानिमित्ताने त्यांच्या निवडीचा सर्व स्तरातून स्वागत होत आहे. अशोक (बाबुशेठ) बोरा यांना पुन्हा राष्ट्रीय पातळीवर काम करण्याची संधी, ही त्यांच्या कामाची पावती समजण्यात येत असून त्या दिशेने निश्चितच जैन कॉन्फरन्सला एक नवीन उच्चांक प्राप्त करण्यात त्यांचा सहयोग व मार्गदर्शन  मोलाचा असेल असे प्रतिपादन राष्ट्रीय अध्यक्ष  आनंदमलजी छल्लाणी यांनी केले आहे.

COMMENTS