जुन्या व्हायरसचा बंदोबस्त करणार ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता राणेंना लगावला टोला

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जुन्या व्हायरसचा बंदोबस्त करणार ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता राणेंना लगावला टोला

मुंबई/प्रतिनिधी : राज्यावरील कोरोनाचे संकट अद्याप पूर्णपणे गेलेले नाही. अजूनही थोडे दिवस थांबले पाहिजे. काही जुने व्हायरस परत आलेत. जुने व्हायरस कारण

तिरुपतीला पाच किलो सोन्याची तलवार अर्पण DAINIK LOKMNTHAN
अहमदनगर – औरंगाबाद रेल्वे मार्गाला चालना देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश; देवगड, नेवासा व शनिशिंगणापूरला होणार अधिक लाभ
ढवळपुरीत ‘रेकॉर्ड ब्रेक’ लसीकरण, एकाच दिवसात तब्बल अकराशे नागरिकांनी घेतली लस.

मुंबई/प्रतिनिधी : राज्यावरील कोरोनाचे संकट अद्याप पूर्णपणे गेलेले नाही. अजूनही थोडे दिवस थांबले पाहिजे. काही जुने व्हायरस परत आलेत. जुने व्हायरस कारण नसताना साईड इफेक्ट्स आणत आहेत. त्या व्हायरसचा बंदोबस्त करणार असल्याचा सूचक इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे नाव न घेता दिला. मुंबई येथे एका उद्योगविषयक संमेलनात ते बोलत होते.
राज्यातील काहीजण म्हणतील हे उघड केले, ते उघडे का करत नाही. काही दिवस थांबा. टप्प्याटप्प्याने आपल्याला सर्व उघडे करायचे आहे. एक दिवस हळूवारपणाने मास्कही काढायचा आहे, असेही त्यांनी सांगितले. कोरोना संसर्गानंतर लागलेल्या लॉकडाऊनचा फटका बसलेल्या उद्योग क्षेत्राला मुख्यमंत्र्यांनी आश्‍वस्त करण्याचा प्रयत्न केला. ’उद्योगांना कुशल मनुष्यबळ निर्माण करून देण्याची जबाबदारी सरकारने घेतली आहे. ’उद्योग मित्र’सारखी संकल्पना आपण राबवत आहोत. हे ’उद्योग मित्र’ राज्यात गुंतवणूक कशी करायची याचे उत्तम मार्गदर्शन करतील अशी व्यवस्था आपण निर्माण केली आहे. वन विंडो सिस्टीम आपण निर्माण केली आहे. गुंतवणूकीसाठी ’आपलेपणा’ची भावना निर्माण करण्याचे काम सरकार करत आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी उद्योजकांना आश्‍वस्त केले. ’इतर राज्यातील मुख्यमंत्री महाराष्ट्रात येऊन उद्योजकांना त्यांच्या राज्यात गुंतवणुकीचे आवाहन करतात. ही वेळ महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवर येऊ नये, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. ’महाराष्ट्राला उद्योग व उद्योजकांची खूप गरज आहे. उद्योजकांना सोयी सुविधा द्यायच्या आहेत, वीजेचा दर कमी करायचा आहे, पण समतोल साधत आपल्याला पुढे जायचे आहे. उद्योजकच महाराष्ट्राचे ब्रॅण्ड व्हावेत, असे मला वाटते. त्यासाठी उद्योजकांना आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.


अर्थचक्रासाठी उद्योग सुरू राहणे महत्वाचे
सामान्य नागरिकांना रोजीरोटी मिळाली नाही तर देशात नाही तर जगात अस्वस्थता माजेल. हे होऊ नये म्हणून पुढच्या काळात उद्योग, उद्योजकांची महाराष्ट्राला खूप गरज आहे. ठरवलेल्या धोरणाची अंमलबजावणी होते की नाही हे पाहणेे ही महत्वाचे आहे. उद्योजकांना सोयी सुविधा द्यायच्या आहेत, वीजेचा दर कमी करायचा आहे, पण समतोल साधत आपल्याला पुढे जायचे आहे. उद्योजक, सर्वसामान्य नागरिक आणि सगळ्या घटकांकडे मला मुख्यमंत्री म्हणून समान लक्ष द्यायचे आहे. अर्थचक्र सुरु राहण्यासाठी उद्योग सुरु राहणे महत्वाचे आहे. हे आपण का करतो तर दोन घास शांततेने खाण्यास मिळण्यासाठी. त्या शेतकर्‍यांना जपणे ही शासनाची जबाबदारी असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

COMMENTS