नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, शुक्रवारी जुन्या गाड्यांची स्क्रॅपिंग पॉलिसी लाँच केली आहे. अहमदाबादमधील इन्व्हेस्टर समिटला व्हिडीओ कॉन
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, शुक्रवारी जुन्या गाड्यांची स्क्रॅपिंग पॉलिसी लाँच केली आहे. अहमदाबादमधील इन्व्हेस्टर समिटला व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे मोंदींनी संबोधित केले. स्क्रॅपिंग पॉलिसीअंतर्गत देशभरात जवळपास 10 हजार कोटी रुपयांच्या गुंतवणूक होईल, अशी आशा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली.या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी अहमदाबाद येथे कार्यक्रमस्थळावर उपस्थित होते. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी यंदाच्या अर्थसंकल्पाच या पॉलिसीची घोषणा केली होती.
यावेळी पंतप्रधान म्हणाले की, स्क्रॅपिंग पॉलिसीमुळे देशात सकारात्मक वातावरण निर्माण होईल. या धोरणांतर्गत देशात 10 हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची शक्यता आहे. पुनर्वापर, पुनर्निर्मीती आणि पुनर्प्राप्ती या तीन त्वावर स्क्रॅपिंग धोरण चालेल, अन् भारताच्या अर्थव्यवस्थेवर याचा मोठा परिणाम होणार आहे, असे मोदी यांनी सांगितले. स्क्रॅपिंग पॉलिसी ही भारताच्या मोबालिटी आणि ऑटो स्केटरला नवीन दिशा देईल, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला. तसेच ‘मोबालिटीचा देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये मोठा हिस्सा आहे. आर्थिक विकासासाठी याची भूमिका सर्वात महत्वाची आहे. नव्या स्क्रॅपिंग पॉलिसीचा ‘वेस्ट टू वेल्थ’चा मंत्र देशाच्या अर्थव्यवस्थेला पुढे नेईल. पुढील 25 वर्षे देशासाठी अतिशय महत्वाची आहेत. ज्या पद्धतीने तंत्रज्ञान बदलत आहे, त्यानुसार आपल्यालाही बदल करणं गरजेचं आहे. आपण, सध्यावातावरणाच्या बदलाच्या संकटाला सामोरं जात आहोत. त्यामुळे स्क्रॅपिंग पॉलिसीसारखं पाऊल उचलावं लागेल. स्क्रॅप करण्याच्या गाडीचे एक सर्टिफिकेट मिळेल. यामुळे नवीन गाडी खरेदी करताना तिचे रजिस्ट्रेशन आणि रोड टॅक्सवर सूट दिली मिळेल. जुन्या गाडीचा मेन्टेनन्स जास्त असतो. रिपेअर कॉस्ट, फ्युअल इफिशिअन्सी याद्वारे पैसे खर्च होतात. ते वाचतील. कंपन्यांनी आर अँड डी ते इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आपला सहभाग वाढवावा. यासाठी जी मदत लागेल ती सरकार देण्यास तयार आहे, असे आश्वासनही पंतप्रधानांनी दिले.
COMMENTS