जीएसटी उपायुक्तांह दोघांचा  कामशेत बोगद्यात अपघाती मृत्यू

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जीएसटी उपायुक्तांह दोघांचा कामशेत बोगद्यात अपघाती मृत्यू

पुणे एक्स्प्रेस वेवरील कामशेत बोगद्यात इनोव्हा कारचा टायर फुटल्यामुळे झालेल्या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.

अल खिदमाह हॉस्पिटलमध्ये गोर गरिबांसाठी मोफत औषध उपचार होणार –   खासदार इम्तियाज जलील
दोन महिलांची नग्न धिंड काढल्याने देशभरात संताप
विम्याचे पैसे न दिल्यास विमा कंपन्यांवर गुन्हे दाखल करणार : कृषिमंत्री दादाजी भुसे

पुणेः मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील कामशेत बोगद्यात इनोव्हा कारचा टायर फुटल्यामुळे झालेल्या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतामध्ये जीएसटी उपायुक्त अभिजित घवले यांचा समावेश आहे.  हा अपघात मंगळवारी सकाळी आठच्या सुमारास झाला.

    घवले हे त्यांच्या आईवडीलांना भेटायला चालले होते. या दुर्घटनेमुळे त्यांची आईवडीलांची भेट अधुरीच राहिली. घवले यांच्यासह शंकर गोडा यतनाल यांचाही या अपघातात मृत्यू झाला आहे. घवले यांच्या आईवडीलांच्या लग्नाचा वाढदिवस असल्यामुळे कार्यक्रमासाठी घवले हे त्यांची पत्नी, साडू व चालक हे इनोव्हा कारने लातूरला गावी चालले होते. आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास मुंबईहून पुण्याकडे जात असताना घवले यांच्या इनोव्हा कारचे कामशेत बोगद्यात पुढचे टायर फुटले. भरधाव वेगात असलेली कार पुढे जाणार्‍या ट्रकवर आदळली. हा अपघात इतका भीषण होता, की इनोव्हा कारच्या समोरच्या भागाचा पूर्णपणे चक्काचूर झाला आहे. या अपघातात कारमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर घवले यांच्या पत्नी व चालक गंभीर जखमी झाले असून, दोघांनाही उपचारासाठी सोमाटणे येथील पवना हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली. या भीषण अपघातामुळे घवले कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.

COMMENTS