अहमदनगर- सहकार क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या अग्रगण्य असणाऱ्या संस्थांना देण्यात येणारा यंदाचा आदर्श सोसायटीचा राज्यस्तरीय पुरस्कार अहम
अहमदनगर-
सहकार क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या अग्रगण्य असणाऱ्या संस्थांना देण्यात येणारा यंदाचा आदर्श सोसायटीचा राज्यस्तरीय पुरस्कार अहमदनगर जिल्हा परिषद सर्व्हन्टस को-आॅप क्रेडिट सोसायटीला जाहीर झाला आहे.
गुरूवारी (दि.२८) राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील व सहकार मंत्रालयाचे प्रधान सचिव अनुप कुमार यांच्या हस्ते चेअरमन संजय कडूस, व्हाईस चेअरमन अशोक काळापहाड, व्यवस्थापक राजेंद्र पवार यांच्यासह संचालक मंडळाला सन्मानित करण्यात येणार आहे सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र देऊन गौरविले जाणार आहे.
मुंबईतील वाय.बी. सेंटर येथे गुरूवारी सकाळी ११ वाजता हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. १९२७ साली स्थापन झालेल्या अहमदनगर जिल्हा परिषद सर्व्हन्टस को-आॅप क्रेडिट सोसायटीने उत्कृष्ट व्यवस्थापन करत जिल्ह्यात नावलौकिक मिळविला आहे. सभासदांना तातडी कर्ज आॅनलाईन मंजुरी, कन्यादान योजना, शैक्षिणक कर्ज, सभासदांचा पाच लाखाचा अपघाती विमा सोसायटीने उतरविलेला आहे.
सभासदाचे अपघाती निधन झाल्यास त्या सभासदाला पाच लाखाचा विमा देण्यासोबतच त्याचे संपूर्ण कर्ज माफी केले जाते. सभासदांना तत्काळ कर्ज पुरवठ थेट खात्यता आरटीजीएसद्वारे केला जातो. संस्था सभासदांना सर्वसाधारण १५ लाख रुपयांपर्यंत कर्ज देते. संस्थेला आयएसओ मानांकन मिळाले आहे. संस्थेला सतत ऑडिट अ वगर्ग मिळत गेला आहे.
सभासद हिताचे निर्णय आणि संस्थेच्या कार्याची दखल घेत अहमदनगर जिल्हा परिषद सर्व्हन्टस को-ऑप क्रेडिट सोसायटीला उत्कृष्ट व्यवस्थापनाचा आदर्श सोसायटी हा मानाचा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील हा पुरस्कार मिळवणारी ही एकमेव सोसायटी ठरली आहे.
COMMENTS