खासदार नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर आज राणा यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
अमरावती / प्रतिनिधी : खासदार नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर आज राणा यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. राणा यांनी दाखल केलेल्या याचिकेमध्ये म्हटले आहे, की मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला निकाल हा अन्यायकारक असून दाखल केलेल्या विशेषाधिकार याचिकेअंतर्गत उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे निरीक्षण करण्याची मागणी केली आहे.
न्यायालयाच्या अखत्यारीत असणार्या जातप्रमाणपत्र पडताळणी समितीला कायदेशीरदृष्ट्या पूर्ण मान्यता व अधिकार आहेत, अश्या न्यायिक समितीने आपल्या सर्व कागदपत्रांची सखोल चौकशी केली. या चौकशीच्या आधारावर आढळलेल्या तथ्यांच्या आधारे सदर जातपडताळणी समितीने माझे जात प्रमाणपत्र वैध असल्याचा या आधी तीन वेळा निर्वाळा दिला आहे. यामुळे उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी खासदार राणा यांचे वकील जेष्ठ विधिज्ञ अॅड ढाकेपालकर आणि अॅड गाडे यांनी आज याचिका दाखल केली आहे. निर्णयाविरोधात जिल्ह्याच्या विकासाला बाधा आणण्याचे आणि माझे खच्चीकरण करण्याचे काम केले असून हे एक राजकीय षडयंत्र आहे. मी संघर्ष करणारी महिला आहे त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हा अंतिम असेल आणि तेथे सत्याचाच विजय होईल असा विश्वास खासदार राणा यांनी व्यक्त केला आहे.
COMMENTS