अहमदनगर - जिल्हा परिषद अहमदनगर आरोग्य विभाग व औषध निर्माण अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमानाने यावेळी उपस्थित जिल्हा परिषद अध्यक्ष सौ रा
अहमदनगर –
जिल्हा परिषद अहमदनगर आरोग्य विभाग व औषध निर्माण अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमानाने
यावेळी उपस्थित जिल्हा परिषद अध्यक्ष सौ राजश्रीताई घुले पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर माजी प्रधान सचिव महेश झगडे सभापती मीरा शेटे डॉ.जिल्हा आरोग्य संदीप सांगळे डॉक्टर सुनील पोटे डॉ. प्रकाश लाळगे संघटनेचे योगेश तिकोणे संजय सुकाळकर योगेश ठाणगे स्वाती ठुबे वृषाली मकासरे आदी उपस्थित होते
यावेळी घुले म्हणाल्या कोरोना संकटात औषध निर्माण अधिकारी यांनी खूप मोठी भूमिका बजावली आहे औषध निर्माण अधिकारी फक्त औषध वाटप करतो असे नाही तर प्रत्येक रुग्णांना त्याची सविस्तर माहिती देतो कोरोना काळात जिल्हा परिषदेचे ग्रामसेवक शिक्षक आरोग्य सेवक आरोग्य अधिकारी यांनी कोरोना काळात महत्त्वाची भूमिका बजावली
मुख्य कार्यकारी अधिकारी क्षीरसागर म्हणाले गेल्या दीड वर्षापासून कोरोना काळात फार्मासिस्ट चे योगदान मोठ्या प्रमाणात आहे कोवीडच्या बाबतीत आपली जबाबदारी अजून संपलेली नाही आपल्याला अजूनही सतर्क राहावे लागेल यामध्ये जिल्हा परिषद यंत्रणा पुर्ण पार पाडत आहे जिल्हा परिषदेच्या सर्वच यंत्रणांनी कोवीडच्या जबाबदाऱ्या अत्यंत कर्तव्यनिष्ठ पार पाडत आहेत
कोरोना काळात औषध निर्माता यांनी उत्कृष्ट काम केले आहे. वैद्यकीय क्षेत्रात डॉक्टरइतकीच महत्त्वपूर्ण भूमिका औषध निर्मात्यांची आहे. त्यामुळे त्यांनी आपली सेवा प्रामाणिक व रुग्णांना फायदेशीर असेल अशीच द्यावी. कोरोनासारख्या महामारी भविष्यातही येतील. त्यामुळे आपण नेहमी सज्ज राहिले पाहिजे, असे प्रतिपादन राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाचे निवृत्त सचिव महेश झगडे यांनी केले.
COMMENTS