पुणे : कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकार राज्य सरकारला सूचना करत आहे. तर दुसरीकडे राज्यातील भाजपच्या चार केंद्रीय मंत्र्यांना जन आशीर्वाद
पुणे : कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकार राज्य सरकारला सूचना करत आहे. तर दुसरीकडे राज्यातील भाजपच्या चार केंद्रीय मंत्र्यांना जन आशीर्वाद यात्रा काढण्यास सांगितले. केंद्र सरकारची ही भूमिका विरोधाभास निर्माण करणारी असून, जन आशीर्वाद यात्रेमुळे कोरोना वाढणार असल्याची टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे.
केंद्र सरकार देशातील सर्व राज्यांना कोरोनाच्या तिसर्या लाटेला गांभीर्याने घ्यायला सांगितले आहे. लक्ष द्या लक्ष द्या म्हणून सरकार सांगते. दुसरीकडे नव्या मंत्र्यांना यात्रा काढायलाही सांगते. या यात्रांमुळे फटका बसणार आहे. जिथे जिथे जन आशीर्वाद यात्रा गेली तिथे तिथे कोरोनाची लागण वाढलेली दिसेल, असे पवार म्हणाले. आपल्याकडे अनेक सण आनंदाने करतो. एकीकडे केंद्र सरकार सांगतं कोरोना आहे काळजी घ्या. चार नवीन मंत्र्यांना मात्र यात्रा काढायला सांगितले जाते. याला कोण जबाबदार आहे? नंतर कोरोना वाढला तर याचा विचार केंद्राने करावा, असे ते म्हणाले. जिथे राजकारण करायच आहे तिकडे सगळे राजकारण करू. पण जिथे जनतेचा प्रश्न आहे, तिकडे सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे. त्यामुळे सण साजरे करताना काळजी घ्या, असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले. मला अनिल देशमुखांबाबत रिपोर्ट मिळत नाही, तोपर्यंत मी यावर बोलणार नाही. अनेक चौकश्या होत असतात. त्यावेळी सगळे चौकशीसाठी मदत करत असतात. त्यामुळे यावर बोलणार नाही, असे त्यांनी सांगितले.
… अन्यथा पुन्हा निर्बंध लावू
केरळ राज्यात निर्बंध कमी केल्याने लोक मोठ्या प्रमाणात बाहेर पडले. ओणम सण मोठ्या प्रमाणात साजरा केला. त्यामुळे आता कोरोनाबाधितांची संख्या प्रचंड वाढली असल्याने पुन्हा निर्बंध लावावे लागले आहेत. महाराष्ट्रात गोपाळकाला, त्यानंतर गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी असे मोठे सण ओळीने येत आहेत. त्यामुळे नागरिकांनी सण साजरे करताना काळजी घ्यावी. अन्यथा पुन्हा निर्बंध लावावे लागतील, असा इशारा उपमुख्यमंंत्री अजित पवार यांनी यांनी दिला.
COMMENTS