छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिलेल्या बुधभूषण पुस्तकाचे ऑनलाईन वाचन

Homeमहाराष्ट्र

छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिलेल्या बुधभूषण पुस्तकाचे ऑनलाईन वाचन

कामेरी (ता वाळवा) येथील रायगड ग्रंथालयाच्या वतीने शुक्रवार, दि. 14 मे रोजी छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या तेजस्वी

वैद्यकीय प्रवेशासाठी आरक्षणाची भेट ;ओबीसींना 27 तर आर्थिक मागासांना 10 टक्के आरक्षण
नगरपालिकेने केली थकबाकीदाराची दुकाने सील
चोर समजून मारहाण, परप्रांतीय तरुणाचा मृत्यू

इस्लामपूर / प्रतिनिधी : कामेरी (ता वाळवा) येथील रायगड ग्रंथालयाच्या वतीने शुक्रवार, दि. 14 मे रोजी छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या तेजस्वी लेखणीतून साकारलेल्या बुधभूषण ग्रंथाच्या साप्ताहिक वाचनाच्या ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. कामेरी परिसरातील युुवक व नागरीकानी याचा लाभ घ्यावा असे आवाहन ग्रंथालयाचे संस्थापक शुभम पाटील यांनी केले आहे.

या पूर्वी प्रत्यक्ष ग्रंथ वाचनाचा कार्यक्रम आयोजित केला जात होता. मात्र, सध्या वाढत्या कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर हा कार्यक्रम ऑनलाईन होणार आहे. शिव-शंभू विचार युवा पिढी च्या मनामनात रुजविण्यासाठी या चळवळीत सहभागी होता येईल. रायगड ग्रंथालयाकडून या कार्यक्रमाची लिंक आपल्या पाठविण्यात येईल. आपण या वाचन चळवळीमध्ये सहभागी व्हावे. वाचन वेळ- 14 मे पासून दररोज सायं. 7 ते 8 वाजता अशी राहणार आहे, अशी माहिती रायगड ग्रंथालय कामेरी यांच्या वतीने देण्यात आली.

COMMENTS