चोरी-घरफोडी करणारे सराईत चोरटे पकडले; स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चोरी-घरफोडी करणारे सराईत चोरटे पकडले; स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

अहमदनगर/प्रतिनिधी- रात्रीचे वेळी घराचे दरवाजे तोडून व लोकांना हत्याराने मारहाण करुन दरोडे घालणारे दोन सराईत चोरटे स्थानिक गुन्हेअन्वेषण शाखेच्या पोलि

मंत्री गडाखांनी राजीनामा देण्याची मुरकुटेंची मागणी
म्हणून अक्षय कुमारने धरले कपिल शर्माचे पाय l फिल्मी मसाला l LokNews24
आमच्या सांघिक कामामुळे विरोधकांना माणसे गोळा करणे जड जात आहे ;- डॉ.सुजय विखे

अहमदनगर/प्रतिनिधी- रात्रीचे वेळी घराचे दरवाजे तोडून व लोकांना हत्याराने मारहाण करुन दरोडे घालणारे दोन सराईत चोरटे स्थानिक गुन्हेअन्वेषण शाखेच्या पोलिसांनी पाठलाग करून पकडले. या चोरट्यांकडून 87 हजार 500 रुपये किमतीचे चार चोरीच्या मोटारसायकली जप्त करण्यात आल्या असून ही कारवाई पोलिसांनी सुरेगाव शिवारातील डोंगरामध्ये केली. जावेद उर्फ जहिर घड्याळ्या चव्हाण (वय 25, रा. सुरेगांव, ता. श्रीगोंदा) व महावीर घड्याळ्या चव्हाण (वय 21, रा. सुरेगाव, ता. श्रीगोंदा) अशी पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत.
याबाबत समजलेली माहिती अशी की, सोमवारी (दि. 18) रात्री निवडुंगे कुटूंब घरामध्ये झोपलेले असताना अनोळखी आरोपींनी घराच्या लोखंडी जाळीचा सेफ्टी दरवाजा कटावनीच्या सहाय्याने तोडून व लाकडी दरवाजा तोडून घरामध्ये प्रवेश केला. घरातील लोकांना लोखंडी कटावनी व गजाने मारहाण करुन कपाटामधील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण 78 हजाराचा ऐवज दरोडा टाकून चोरून नेला होता. प्रकरणी सरिता निवडूंगे (रा. सुपा शिवार, ता. पारनेर) यांच्या फिर्यादीवरून सुपा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
ही घटना घडल्यानंतर पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी गुन्ह्याच्या तपासकामी स्वतंत्र पथक नेमून आरोपींचा शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या. त्याप्रमाणे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांनी गुन्ह्याच्या तपासाकरीता स्वतंत्र पथक नेमले. या गुन्ह्याचा समांतर तपास करुन आरोपींची माहिती घेत असताना पोलिस निरीक्षक कटके यांना गुप्त खबर्‍याकडून खात्रीशीर माहिती मिळाली की, हा गुन्हा जावेद चव्हाण व महावीर चव्हाण (दोघे रा. सुरेगाव, ता. श्रीगोंदा) यांनी व त्यांच्या साथीदारांनी मिळून केला असल्याची माहिती मिळाली. या माहितीनुसार आरोपींच्या ठावठिकाणाबाबत माहिती घेवून सापळा लावून आरोपी जावेद उर्फ जहिर घड्याळ्या चव्हाण व महावीर घड्याळ्या चव्हाण या दोघांना सुरेगाव शिवारातील डोंगरामधून पाठलाग करुन ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या आरोपींकडे गुन्ह्याबाबत कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली आहे.
ताब्यात घेतलेल्या आरोपींकडे त्यांनी आणखी कोठे गुन्हे केलेले आहेत काय, याबाबत कसून चौकशी केली असता आरोपी जावेद उर्फ जहिर घड्याळ्या चव्हाण याने गुंडेगाव (ता. नगर), राळेगण थेरपाळ (ता. पारनेर), यवत (ता. दौंड) या ठिकाणाहून यापूर्वी चार मोटारसायकल चोरी केल्या असल्याची माहिती दिली. मोटारसायकल चोरीबाबत संबंधित पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याबाबत खात्री केली असता आरोपीने चोरी केलेल्या मोटारसायकलबाबत गुन्हे दाखल असून मोटारसायकल चोरीचे एकूण 3 गुन्हे उघडकीस आले आहेत.
दोन्हीही आरोपी सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्याविरुध्द यापूर्वी दरोडा, दरोड्याची तयारी, स्वस्तात सोने देण्याची आमीष दाखवून दरोडा घालणे, चोरी, मारामारी अशा स्वरुपाचे गुन्हे दाखल असून आरोपी जावेद उर्फ जहिर घड्याळ्या चव्हाण हा तीन गुन्ह्यामध्ये फरार होता, अशी माहिती मिळाली. त्यांना पकडण्याची कारवाई सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ दिवटे, सहायक फौजदार नानेकर, पोलिस हवालदार सुनील चव्हाण, दत्तात्रय हिंगडे, भाऊसाहेब काळे, संदीप पवार, पोलिस नाईक शंकर चौधरी, रवि सोनटक्के, पोलिस कॉन्स्टेबल सागर ससाणे, मयूर गायकवाड, रोहित येमूल, जालिंदर माने, प्रकाश वाघ, रविन्द्र घुंगासे, मेघराज कोल्हे यांनी केली आहे.

COMMENTS