चंद्रकांत पाटलांना स्वप्न बघण्याचा छंदः जयंत पाटील

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चंद्रकांत पाटलांना स्वप्न बघण्याचा छंदः जयंत पाटील

कोरोना, मराठा आरक्षण या मुद्द्यांवरून राज्यातील सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात सातत्याने आरोप-प्रत्यारोप होताना पाहायला मिळत आहे.

‘मासा’ची हॉलिवूडवारी
बंधुतेचे तत्वज्ञान माणूस जोडण्यास शिकवते – डॉ. श्रीपाल सबनीस
राकेश टिकैत यांची किसान युनियुनमधून हकालपट्टी

पुणे / प्रतिनिधी: कोरोना, मराठा आरक्षण या मुद्द्यांवरून राज्यातील सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात सातत्याने आरोप-प्रत्यारोप होताना पाहायला मिळत आहे. विरोधक सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारवर एकही टीकेची संधी सोडताना दिसत नाही. यात भाजपमधील चंद्रकांत पाटील तर आघाडीवर आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी सर्वजण  असतानाच हे सरकार  जाईल असे विधान करून राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडून दिली होती; मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी चंद्रकांत पाटलांना स्वप्न पडण्याचा छंद असेल तर त्याला मी काहीच करून शकत नाही, अशा खास शैलीत जोरदार टोला लगावला आहे. 

पुण्यात साखर कारखान्याच्या संदर्भात झालेल्या बैठकीनंतर जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी राज्यातील विविध घडामोडींवर भाष्य करताना चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधला. ते म्हणाले, की महाविकास आघाडीत सर्वकाही आलबेल आहे; मात्र असे वक्तव्य पाटील हे नेहमीच करत असतात. सर्वजण झोपेत असताना सरकार पडेल अशी भविष्यवाणीही त्यांनी केली होती. यावर त्यांना स्वप्न पडण्याचा छंद असेल, तर त्यावर काय बोलणार अशा शब्दात जयंत पाटलांनी चंद्रकांत पाटलांना चिमटा काढला. केंद्रात कोरोनाची चिंताजनक परिस्थिती पाहून अधिवेशन रद्द करण्यात आले आहे. राज्य सरकार अधिवेशन का घेत नाही, याचे कारण जगजाहीर आहे. राज्य सरकारने अधिवेशन घेण्याची हिंमत दाखवावी असे चंद्रकांत पाटील म्हणतात. केंद्राचा नियम हा प्रत्येक राज्यालाही लागू होतो. त्यामुळे महाराष्ट्रातही अधिवेशन होणार नसल्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. टाळेबंदी वाढवण्याबाबत दोन दिवस परिस्थिती पाहूनच मुख्यमंत्री निर्णय घेतील, असे त्यांनी सांगितले. राज्यात कोरोनाची परिस्थिती आटोक्यात येतानाचे चित्र दिसून येत आहे. पॉझिटिव्हीटी रेटही खाली गेले आहेत; पण हा रेट पूर्णपणे कमी होत नाही, तोपर्यंत संकट अजून टळले असे म्हणता येणार नसल्याचे ते म्हणाले.

COMMENTS