चंद्रकांतदादांच्या उपस्थितीत कोरोना नियमांची पायमल्ली

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चंद्रकांतदादांच्या उपस्थितीत कोरोना नियमांची पायमल्ली

अंशतः टाळेबंदीच्या पहिल्याच दिवशी भाजप शहर कार्यालयात वर्धापन दिनाच्या निमित्ताने भाजप नेत्यांनी जमावबंदीच्या नियमाला हरताळ फासला. दरम्यान, सरकारने फसवणूक केली असुन वीकएंड लॅाकडाऊनची चर्चा करून पूर्ण टाळेबंदी केली, असा असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला.

शिक्षणरत्न पुरस्काराने दीपक भुजबळ सन्मानीत
अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे तात्काळ करुन अहवाल सादर करावा
स्वराज्य पक्षाच्या वतीने एक महिना सुरू असलेल्या महिला सक्षमीकरणासाठी मोफत प्रशिक्षणाचा माडसांगवी या ठिकाणी समारोप

पुणे/प्रतिनिधी : अंशतः टाळेबंदीच्या पहिल्याच दिवशी भाजप शहर कार्यालयात  वर्धापन दिनाच्या निमित्ताने भाजप नेत्यांनी जमावबंदीच्या नियमाला हरताळ फासला. दरम्यान, सरकारने फसवणूक केली असुन वीकएंड लॅाकडाऊनची चर्चा करून पूर्ण टाळेबंदी केली, असा असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला.

पुण्यात भाजपच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात मंगळवारी भाजप प्रदेशाध्यक्षांसह जवळपास 15 नेते आणि कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाला हजेरी लावली. पुण्यामध्ये आजपासून अंशतः टाळेबंदीला सुरुवात झाली. या नियमानुसार शहरात सकाळी 7 ते संध्याकाळी 6 दरम्यान शहरात पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र यायला परवानगी नाही. तरीदेखील हे नेते, कार्यकर्ते एकत्र आले. अर्थातच कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता हा कार्यक्रम अत्यंत साधेपणाने करत असल्याचे सांगायलाही ते विसरले नाहीत. या कार्यक्रमाला सध्याची सामाजिक, राजकीय परिस्थिती लक्षात घेता थोड्याच लोकांना बोलावले आहे, असे पाटील म्हणाले. दरम्यान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जरी निर्बंधांना पाठिंबा दिला असला, तरी पाटील यांनी त्याला आक्षेप घेतला आहे. ते म्हणाले, की सरकारने फसवणूक केली आहे. त्यांनी फडणवीसाांना सांगितले होते, की वीकएंड लॉकडाऊन असेल; मात्र हा संपूर्ण लॅाकडाऊन आहे. गोरगरीबांच्या पोटाचे काय? व्यापारीदेखील मला फोन करत आहेत. त्यांचा काहीच विचार केला जात नाही. या वेळी खासदार गिरीश बापट म्हणाले, की हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होऊ शकला असता; परंतु आभासी मेळाव्याच्या माध्यमातून हा कार्यक्रम करत आहोत.  कोरोनाच्या परिस्थितीबाबत सांगत शहराध्यक्ष जगदीश मुळीक म्हणाले, की आज आभासी मेळाव्याचे आयोजन केले आहे. आपण त्या निमित्ताने लसीकरणालाठी मोहीम सुरू करीत आहोत; पण राज्य सरकारचा मोगलाई लादायचा प्रयत्न चालला आहे. पीएमपीएमएल बंद करण्याचा निर्णय घेतला आहे; मात्र हा निर्णय आम्ही मान्य करणार नाही. त्याला विरोध करणार. महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले, की कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आम्ही साधेपणाने वर्धापन दिन साजरा करत आहोत. राज्यातील सामाजिक परिस्थिती पाहता त्यामध्ये सामाजिक भान जपलेले आपल्याला दिसते.

COMMENTS