चंदगड : चंदगड तालुक्यात स्वच्छतारूपी गांधी जयंती साजरी (Video)

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चंदगड : चंदगड तालुक्यात स्वच्छतारूपी गांधी जयंती साजरी (Video)

खरा भारत हा खेडयात आहे. खेडयाकडे चला असा मंत्र गांधीजीनी तरूणांना दिला.गांधीजीनी स्वच्छ भारताचे स्वप्न पाहिले.  गांधी जयंतीचे औचित्य साधून  चंदगडच्या

चंदगड येथील फाटकवाडी धरणाला गळती (Video)
Lonand : सिविल सर्जन हटाव रुग्ण बचाओ आंदोलन (Video)
Lonand : लोणंद शहरातील रेल्वे स्थानकामध्ये अंधाराचे साम्राज्य (Video)

खरा भारत हा खेडयात आहे. खेडयाकडे चला असा मंत्र गांधीजीनी तरूणांना दिला.गांधीजीनी स्वच्छ भारताचे स्वप्न पाहिले.  गांधी जयंतीचे औचित्य साधून  चंदगडच्या दि न्यू इंग्लिश स्कूलच्या  व न. भु. पाटील ज्यु.कॉलेजच्या प्राध्याकांनी   स्वच्छतारुपी गांधी जयंती  साजरी केली. एरव्ही झाडू, घमेले, बुट्टी हे साहित्य शाळेच्या शिपायांच्या हातात दिसतं. 
कार्यक्रमाच्या सुरवातीला राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन चंदगड नगरपंचायतीचे  उपनगराध्यक्ष फिरोज मुल्ला यांच्या हस्ते झाले. 
‘गांधीच्या जीवनातून कार्यपध्दतीतून, आचार विचारातून अनेक गोष्टी शिकायला मिळतात. गांधीजीची दिनचर्या ही स्वच्छतेवर आधारलेली होती.आपला परिसर, गाव, देश स्वच्छ करणे हीच खरी गांधी जयंती आहे ‘ असे प्रतिपादन प्राचार्य आर.आय. पाटील यांनी केले. कार्यक्रमाला  संजय साबळे,  आर.पी. पाटील, टी. एस. चांदेकर  व विद्यार्थी आदी उपस्थित होते. 

COMMENTS