घरी गेल्यावर दोन वृक्ष लावा..  सुश्री भारतीताई जाधव यांचा संजीवनी कोविड सेंटर मधील रूग्णांना मौलिक सल्ला

Homeमहाराष्ट्रअहमदनगर

घरी गेल्यावर दोन वृक्ष लावा.. सुश्री भारतीताई जाधव यांचा संजीवनी कोविड सेंटर मधील रूग्णांना मौलिक सल्ला

कोपरगाव / ता.प्रतिनिधी प्राणवायु शिवाय जीवन निरर्थक आहे, जीवनामध्ये प्राणवायुला किती महत्वाचे स्थान आहे, हे आपल्याला ज्ञात आहेच, सध्याच्या कोरोना परिस्थितीमध्ये रूग्णांना आक्सीजनअभावी वेदना सहन कराव्या लागत आहे, याची प्रचिती आज सर्वांनाच आलेली आहे.

निंबळकला रविवारी नगर तालुका ग्रामीण साहित्य संमेलन
कला सन्मान पुरस्काराने राजेंद्र टाक सन्मानित
वज्रेश्‍वरी मातेच्या यात्रोत्सवास आजपासून सुरूवात

कोपरगाव / ता.प्रतिनिधी प्राणवायु शिवाय जीवन निरर्थक आहे, जीवनामध्ये प्राणवायुला किती महत्वाचे स्थान आहे, हे आपल्याला ज्ञात आहेच, सध्याच्या कोरोना परिस्थितीमध्ये रूग्णांना आक्सीजनअभावी वेदना सहन कराव्या लागत आहे, याची प्रचिती आज सर्वांनाच आलेली आहे. त्याकरीता प्रत्येक रूग्णांनी बरे होउन घरी गेल्यावर किमान दोन वृक्षांची लागवड करावी, त्याचे जतन करून ती मोठी करावीत असा मौलीक सल्ला सुश्री भारतीताई जाधव यांनी दिला. आत्मा मालिक शैक्षणिक संकुलामध्ये सुरू असलेल्या संजीवनी कोविड केअर सेंटर येथे रूग्णांना मार्गदर्षन करतांना  जाधव बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या, सध्याचा काळ कठीण आहे, कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावामुळे जनजीवन विस्कळीत झालेले आहे. यावर सामूहीक पणे मात करण्याची गरज आहे. संजीवनी कोविड केअर संेटरच्या माध्यमातून कोल्हे परिवाराने आपला जनसेवेचा वारसा अखंडीत ठेवला आहे. या सेंटरमध्ये येणा-या प्रत्येक रूग्णाला बरे करण्याचा, त्यांचे मानसिक स्वास्थ जपण्यासाठीचे प्रयत्न निष्चितच वाखाणण्याजोगे आहे. आजच्या युगात हे पाउल उचलणे कठीण काम आहे, परंतु संजीवनीच्या माध्यमातून ही रूग्णसेवा सुरू आहे, त्याचा आपल्याला निष्चितच फायदा होत आहे, आपण याठिकाणी सकारात्मक भाव ठेवावा. कोरोना हा बरा होणारा आजार असुन कोणीही घाबरण्याचे कारण नाही. यासाठी फक्त नियम पाळण्याची गरज आहे. नियमांचे पालन करा, मन प्रसन्न ठेवा, मानसिक हिंमत ठेवा. यातून आपण निष्चितच बाहेर पडू. मी स्वतः कोरोना बाधित झाले होते, आपल्या सर्वांच्या आशिर्वादाने मी बरी होउन आज आपल्यापुढे उभी आहे. सध्याच्या परिस्थितीत कोरोनाच्या महामारीने भयावह परिस्थिती निर्माण केली आहे, तरूणवर्गामध्ये या आजाराचे प्रमाण वाढते आहे, ही आपल्यासाठी निष्चितच चिंतेची बाब आहे. या परिस्थितीत एकमेकांना आधार दया. अनेकांना आज आॅक्सीजनची गरज पडत आहे. यामुळे आपल्या जीवनात प्राणवायुचे स्थान किती महत्वाचे आहे, याची प्रचिती आली. याकरीता आपण निष्चितच यातून बरे होणार आहे, हा आत्मविष्वास बाळगा. परंतु आपण येथुन बरे होउन जेव्हा घरी जाल त्यावेळी दोन वृक्ष लावा,त्यांना जतन करा. ती मोठी करा. त्यामुळे निष्चितच प्राणवायु मिळण्यास मदत होणार असल्याचे सुश्री जाधव म्हणाल्या.
चौकट- रुग्णांच्या सेवेसाठी सर्वांगिण प्रयत्न.
कोल्हे परिवाराने घेतलेला समाजसेवेचा वसा अखंडित सुरू असून येथील रुग्णांची सेवा करण्यासाठी सर्वांगिण प्रयत्न केले जात आहे. औषधे, पौष्टीक आहार, मनोरंजन, मार्गदर्शनपर व्याख्याने आदी गोष्टीतून रुग्णांचे मनोबल वाढविण्याचा उपक्रम स्तुत्य असल्याचे सुश्री भारतीताई जाधव म्हणाल्या

COMMENTS