Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गो मांसची वाहतूक करणारी गाडी शिरवळ येथे पकडली; शिरवळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

शिरवळ, ता. खंडाळा येथील परिसरात शनिवार, दि. 10 एप्रिल रोजी खंडाळा तालुक्यातील शिवप्रतिष्ठानच्या धारकर्‍यानी गोमांसची वाहतूक करणारी गाडी पकडली.

बार मालकाकडून माजी नगरसेवकावर हल्ला l LOKNews24
कानडगाव येथे सशस्त्र दरोडा
इस्त्रो चंद्रावर पाठवणार माणूस

लोणंद / वार्ताहर : शिरवळ, ता. खंडाळा येथील परिसरात शनिवार, दि. 10 एप्रिल रोजी खंडाळा तालुक्यातील शिवप्रतिष्ठानच्या धारकर्‍यानी गोमांसची वाहतूक करणारी गाडी पकडली. याप्रकरणी संबधितांविरोधात शिरवळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी आहे की, सकाळी ठीक 9 वाजताच्या सुमारास शिरवळ, ता. खंडाळा गावच्या हद्दीत पंढरपूर फाटा येथील ब्रिजवर गोमांसची गाडी जाणार आहे. अशी बातमी लागल्याने त्या गाडीला पकडण्यासाठी काही युवक पंढरपूर फाटा येथे थांबले होते. गोमांसची वाहतूक करणारी लेलँड कंपनीची बडादोस्त गाडी संशयास्पद वाटल्याने व गाडीतून पाणी पडत असल्याचे निदर्शनास आल्याने गोरक्षक निखिल खंडागळे, पियूष गाढवे, श्रीकांत जाधव, युवराज गायकवाड यांनी गाडी चालकास पंढरपूर फाटा शिरवळ येथे विचारपूस केली असता गाडीत गोमांस वाहतूक होत असल्याचे समजले. याबाबतची माहिती शिरवळ पोलिस स्टेशनला देण्यात आली. तत्पूर्वी गाडी चालक रईस महमद साब शेख (रा. सदरबझार सातारा) यांच्या समवेत असणारा इद्रिस रोप कुरेशी याने या दरम्यान पलायन केले. शिरवळ पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार वळवी, हवालदार इंगवले व दिघे हे तिथे आले असता गाडीसह एकूण 5 हजार 395 किलो मांस जप्त करून गाडीसह चालकास ताब्यात घेतले. बर्फामध्ये जनावरांचे मांस व गाई म्हैशीचे मुंडके होते. वाहनधारकाकडे मांस वाहतुकीचा कोणताही परवाना नसताना अवैध रित्या गायी म्हैशी कतल करून विनापरवाना मास वाहतुक करत असल्याचे आढळुन आले. अवैध रित्या मांस वाहतूक करणार्‍यांविरोधात महाराष्ट्र प्राणी संरक्षण (सुधारणा) अधिनियम 1995 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पळून गेलेल्या संशयिताचा पोलीस शोध घेत आहते. पुढील तपास हवालदार पंडित करत आहेत.

COMMENTS