Homeताज्या बातम्याटेक्नोलॉजी

गॅस सिलिंडरच्या दरात मोठी कपात.

मुंबईमध्ये सिलिंडरसाठी आता 1844 रुपये मोजावे लागणार आहेत.

एकीकडे रोज कोणत्या ना कोणत्या गोष्टीची किंमत वाढत आहेत. महागाई दिवसेंदिवस वाढत असतानाच गणेशाच्या आगमनानंतर सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी व्

दिव्यांग सहाय्य संस्था सुरू करण्याचा मानस : कुलपती डॉ. सुरेश भोसले
दुष्काळी भागात स्ट्रॉबेरीची लागवड; पुसेगाव परिसरातील शेतकर्‍यांचा यशस्वी प्रयोग
गुगल ड्राईव्हमधून आपोआप डेटा डिलीट; कंपनीचा यूजर्सना इशारा

एकीकडे रोज कोणत्या ना कोणत्या गोष्टीची किंमत वाढत आहेत. महागाई दिवसेंदिवस वाढत असतानाच गणेशाच्या आगमनानंतर सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे. एलपीजी गॅसच्या दरात मोठी कपात करण्यात आली आहे. एलपीजी गॅसचे प्रति सिलिंडर दर 100 रुपयांनी कमी झाले आहेत. मात्र ही कपात केवळ व्यवसायिक गॅस सिलिंडरच्याच दरात करण्यात आली आहे. घरगुती वापराच्या 14.2 किलो गॅस सिलिंडरच्या दरात कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या किमती स्थिर आहेत. व्यवसायिक गॅस सिलिंडरच्या दरात जवळपास 100 रुपयांनी कपात करण्यात आली आहे. तर नव्या दरानुसार आता राजधानी दिल्लीमध्ये एलपीजी गॅसचा दर प्रति सिलिंडर 1885 एवढा झाला आहे. तो पूर्वी 1976.50 रुपये इतका होता. कोलकतामध्ये कपातीनंतर गॅस सिलिंडरचे दर 1995.5 इतके झाले आहेत. पूर्वी ते 2095 रुपये इतके होते. आर्थिक राजधानी मुंबईमध्ये नव्या दरानुसार एका व्यवसायिक गॅस सिलिंडरसाठी आता 1844 रुपये मोजावे लागणार आहेत.

COMMENTS