गुजरातमध्ये राजकीय घडामोडींना वेग… मोदी, अमित शहांचे खास असलेल्या मुख्यमंत्री रूपानी यांचा राजीनामा

Homeताज्या बातम्यादेश

गुजरातमध्ये राजकीय घडामोडींना वेग… मोदी, अमित शहांचे खास असलेल्या मुख्यमंत्री रूपानी यांचा राजीनामा

वेब टीम : अहमदाबादआगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गुजरातमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे . गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी आपल्य

पुण्यात साडेचार लाखाचे कोकेन जप्त
बंदुकीचा धाक दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार| LOKNews24
आदित्य ब्राह्मणेला मरणोत्तर प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान

वेब टीम : अहमदाबाद
आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गुजरातमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे . गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

मात्र मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ संपण्याअगोदर रुपाणी यांनी राजीनामा दिल्याने गुजरातच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. यानंतर गुजरातमध्ये पुढील मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे .

गुजरातचे आगामी मुख्यमंत्री म्हणून नितीन पटेल यांच्या नावाची चाटच राजकीय वर्तुळात रंगली आहे . आनंदीबेन पटेल यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता

तेव्हाही नितीन पटेल मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत होते . आता रुपाणी यांच्या राजीनाम्यानंतर पुन्हा एकदा त्यांच्या नावाची चर्चा भाजपच्या गोटात सुरु आहे .

विजय रुपाणी यांनी राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला. मला पाच वर्षासाठी मुख्यमंत्री पदाची जबाबदारी मिळाली. ही गोष्ट ही मोठी गोष्ट आहे,

याकरिता रुपाणी यांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले. रुपाणी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून 7 ऑगस्ट 2016 शपथ घेतली. भाजपाने गुजरातमध्ये १८२ पैकी ९९ जागा जिंकून आपली सत्ता काबीज केली होती.

रुपाणी ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या जवळचे मानले जातात.

COMMENTS