गावातील कीर्तनकारांच्या सेवेने अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गावातील कीर्तनकारांच्या सेवेने अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता

कोपरगांव प्रतिनिधी-  तालुक्यातील पढेगांव येथे सदगुरु गंगागिरी महाराज यांच्याप्रती असलेल्या श्रद्धा भावातुन सालाबादप्रमाणे श्रावणमासानिमित्त अखंड

आनंदऋषीजीमध्ये एका महिन्यात 2401 मोतीबिंदू शस्त्रक्रियांचा विक्रम
मोबाईलने घेतले दोन मुलींचे बळी
पार्वताबाई बाबुराव आरोटे यांचे निधन

कोपरगांव प्रतिनिधी-  तालुक्यातील पढेगांव येथे सदगुरु गंगागिरी महाराज यांच्याप्रती असलेल्या श्रद्धा भावातुन सालाबादप्रमाणे श्रावणमासानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात येते.या कालावधीत सातत्याने आठ दिवस कीर्तन ,भजनाचे आयोजन करण्यात आले होते.आज सकाळी गंगागिरी महाराज यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली.त्यानंतर  ह.भ.प.भास्कर महाराज दाणे यांच्या कीर्तनसेवेने सप्ताहाची सांगता झाली.

      कोरोनाच्या महामारीत परंपरा चालविण्याच्या हेतुने आणि बाहेरील कीर्तनकारांवरील होणारी पैशांची उधळण याला फाटा देत सात दिवस दैनंदिन भजन पूजनाची आवड असलेल्या संत साहित्याचा अभ्यास असलेले नवोदित किर्तनकार नानासाहेब उसरे,अण्णासाहेब शिंदे ,सुभाष जगताप,दिगंबर वाघ,भगिरथ शिंदे,दिपक शिंदे ,भास्कर दाणे आदिंच्या कीर्तनाने आणि गावातील भारुड मंडळ यांच्या विनामुल्य सेवेने सप्ताहाची चांगलीच रंगत वाढली.यानिमित्ताने गावातील नवोदित महाराजांना व्यासपीठ मिळाल्याने त्यांनीही याबाबद समाधान व्यक्त केले.त्यांचाही आत्मविश्वास वाढिस लागला , परंपरा जोपासली गेली आणि अनाठायी खर्चाला आळा बसुन उद्देशही सफल झाला.

    काल्याच्या कीर्तनरुपी सेवेत बोलताना दाणे महाराज म्हणाले,दही आणि लाही या दोन्हीचे एकत्रीकरण म्हणजेच काला.लाह्या किंवा चुरमुरे हे सर्व जीवाचे प्रतिक असुन त्यामध्ये ताक किंवा दही मिसळावे लागते.त्यामुळे सर्वजण एकत्र येतात.हा वेदांतील लोकांचा जीव ब्रम्ह ऐक्याचा काला हा वारकऱ्यांना विशेष मान्य नाही.कारण भेदाशिवाय प्रेम करता येत नाही.साधूसंत महात्मे हे अभेदातून प्रेमरसाकरीता भेदात आले.हा काला वैंकुठात आणि स्वर्गात होत नसुन केवळ मृत्यूलोकात होत असल्याने काल्याला महत्त्व आहे.स्वर्गातील देवताही त्यापासुन वंचित आहे.यासाठी वारकरी होऊनच काला मिळतो.”काल्याचिया असे देवजळी झाले मासे”देव माश्याच्यारुपाने मृत्युलोकात येऊनही काला मिळाला नाही.यावेळी त्यांनी अनेक कृष्णलीला भाविकांना सांगितल्या.यावेळी पंचक्रोषीतील भाविक,भजनीमंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS