गडकरी यांच्यासमोर सुरक्षा व्यवस्थेत राडा

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गडकरी यांच्यासमोर सुरक्षा व्यवस्थेत राडा

केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी आजपासून चार दिवसीय कुलू दौर्‍यावर आहेत. या दौर्‍यादरम्यान ते अटल टनल रोहतांग याचे निरीक्षण करणार असून लाहुल भागात फेरफटका मारणार असल्याची माहिती समोर आली आहे.

जेईई मेन निकाल जाहीर 
गावांच्या शाश्वत विकासासाठी QCI आणि नाशिक जिल्हा परिषदेने दिले दोनशेहून अधिक सरपंचांना प्रशिक्षण
सुप्रसिद्ध निवेदक अमीन सयानी यांचे निधन

कुलूः केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी आजपासून चार दिवसीय कुलू दौर्‍यावर आहेत. या दौर्‍यादरम्यान ते अटल टनल रोहतांग याचे निरीक्षण करणार असून लाहुल भागात फेरफटका मारणार असल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय ते मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांच्यासह बैठकदेखील करणार आहे; मात्र या दौर्‍यादरम्यान त्यांच्यासमोर राडा झाल्याचा धक्कादायक घडला. 

    भुंतर विमानतळाबाहेर पोलिस अधिकार्‍यांमध्ये मारहाण झाल्याचे वृत्त आहे. एसपी कुल्लू गौरव सिंह यांनी मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षा प्रमुखाला कारशिलात लगावल्याचेदेखील सांगितले जात आहे. त्यानंतर मात्र संतापवलेल्या सुरक्षा प्रमुख आणि अन्य पोलिस कर्मचार्‍यांनी एसपी गौरव यांना लाथ मारली. हा सर्व प्रकार मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांच्या समोर झाले आहे. गडकरी यांच्या कारकेटमध्ये मुख्यमंत्र्यांच वाहन आणि सुरक्षेबाबत वाद झाला. या घटनेनंतर ’सोशल मीडिया’वर हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. सुरक्षेबाबत निर्माण झालेल्या वादातून हा प्रकार घडल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

COMMENTS