अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेशी निगडीत असलेल्या गटसचिवांच्या सुरक्षिततेचा विचार करून त्यांना बॅंकेने वैदयकिय विमा सुरक्षा कवच द्यावे तसेच कोविड १९ लस मोफत उपलब्ध करून देण्यात यावी,अशी मागणी बॅंकेचे संचालक विवेकभैया बिपीनादादा कोल्हे यांनी अध्यक्ष अॅड उदयजी शेळके यांचेकडे केली आहे.
कोपरगाव शहर प्रतिनिधी : अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेशी निगडीत असलेल्या गटसचिवांच्या सुरक्षिततेचा विचार करून त्यांना बॅंकेने वैदयकिय विमा सुरक्षा कवच द्यावे तसेच कोविड १९ लस मोफत उपलब्ध करून देण्यात यावी,अशी मागणी बॅंकेचे संचालक विवेकभैया बिपीनादादा कोल्हे यांनी अध्यक्ष अॅड उदयजी शेळके यांचेकडे केली आहे.
जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष अॅड उदय शेळके यांची प्रत्यक्ष भेट घेत त्यांना या मागणीचे निवेदन दिले, श्री कोल्हे यांनी दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थाच्या खरीप पिक कर्जाची वसुली तसेच इतर कर्ज वसुली साठी गटसचिवांना सभासदांच्या घरोघरी जावे लागते. त्याचप्रमाणे अनेक सचिवांकडे दोन पेक्षा जास्त सोसायटयांचे कामकाज असल्याने दुचाकीवरून या गावाहून दुस-या गावाकडे प्रवास करावा लागतो. मुळातच तुटपुंज्या वेतनावर काम करणा-या गटसचिवांचे महागाईमुळे आर्थीक गणित कोलमडत आहे त्यात दुदैवाने काही अपघात घडल्यास अथवा आजाराला सामोरे जाण्याची वेळ आली तर त्यांच्यापुढे आर्थीक संकट उभे रहाते.सध्या कोरोना आजाराचा प्रादुर्भाव झपाटयाने वाढत आहे. दिवसागणिक रूग्णांची संख्या वाढत आहे. या परिस्थितही सचिव घरोघरी जाउन वसुलीची कामे करत आहे. दैनंदिन कामकाजाचा विचार करता गटसचिवांना बॅकेमार्फत कायम स्वरूपी वैदयकिय विमा सुरक्षा कवच देणकामी विचार व्हावा, तसेच सध्या सुरू असलेल्या कोविड १९ लसीकरण मोहीमेदरम्यान गटसचिवांना बॅंकेने मोफत लस उपलब्ध करून दयावी,असेही श्री कोल्हे यांनी निवेदनात म्हटले आहे.
COMMENTS