दिल्लीच्या तिहार कारागृहात शिक्षा भोगत असलेला कुख्यात गँगस्टर छोटा राजन याला करोनाची लागण झाली आहे.
नवी दिल्ली : दिल्लीच्या तिहार कारागृहात शिक्षा भोगत असलेला कुख्यात गँगस्टर छोटा राजन याला करोनाची लागण झाली आहे. त्याच्यावर तुरुंगातील रुग्णालयात उपचार सुरु असल्याचे तुरुंग प्रशासनाकडून सांगण्यात आलें. यापूर्वी बिहारचा कुख्यात गुंड मोहम्माद शहाबुद्दील याला देखील कोरोनाची लागण झाली होती.
तिहार कारागृहातील तुरुंग क्रमांक दोनमध्ये छोटा राजनला ठेवण्यात आले असून या ठिकाणी करोनाचे रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर छोटा राजनमध्ये देखील करोनाची लक्षणे दिसून आली. त्यानंतर त्याची करोना चाचणी करण्यात आली. त्यात छोटा राजनला करोना झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर तिथे तैनात असलेल्या सुरक्षारक्षकांना होम क्वारंटाइन होण्यास सांगितलं आहे. तसेच तुरुंगातील कैद्यांना वेगळे ठेवण्यात आल्याचे कारागृह प्रशासनाने सांगितले. मुंबईतील विशेष सीबीआय कोर्टाने जानेवारी महिन्यात कुख्यात गँगस्टर छोटा राजनला खंडणी प्रकरणी 2 वर्षांती शिक्षा सुनावली आहे. पनवेलमधील बांधकाम व्यावसायिकाकडे 26 कोटींची खंडणी मागितली होती. हे प्रकरण 2015 सालचे आहे. मुंबईतले हे तिसरे प्रकरण आहे, ज्यात छोटा राजनला शिक्षा सुनावण्यात आली. यापूर्वी दिल्लीतील बनावट पासपोर्ट प्रकरणातही शिक्षा सुनावण्यात आली आहे.
COMMENTS