खांडगाव शिवारात बंद घर फोडून सव्वा लाखाची चोरी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

खांडगाव शिवारात बंद घर फोडून सव्वा लाखाची चोरी

अहमदनगर/प्रतिनिधी- मुलाच्या लग्न समारंभासाठी बाहेरगावी गेलेल्या कुटुंबाच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरांनी आतील सुमारे सव्वा लाख रुपये किमतीचा

प्रा. डॉ. विजय देशमुख यांना राष्ट्रीय आदर्श क्रीडा शिक्षक  पुरस्कार
सांडव्याच्या स्वामी मठात आज दत्त जयंती ; विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
एकलव्य महिला आघाडीची बोलकी येथे बैठक उत्साहात

अहमदनगर/प्रतिनिधी- मुलाच्या लग्न समारंभासाठी बाहेरगावी गेलेल्या कुटुंबाच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरांनी आतील सुमारे सव्वा लाख रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. ही घटना श्रीगोंदा तालुक्यातील खांडगाव येथे घडली. याबाबतची माहिती अशी की बन्सी जाधव (वय-57 रा. जाधव वस्ती, खांडगाव शिवार, ता. श्रीगोंदा) यांनी घर बंद करून त्यांचा मुलगा सुभाष याचे साईबाबा आश्रम (शिर्डी, ता.राहाता) येथे दि. 18 जुले रोजी लग्न असल्यामुळे घरातील सर्वजण घराला कुलूप लावून रघु टकले यास राखणदार म्हणून ठेवून लग्नासाठी गेले होते. तेथील लग्नाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर विकास जाधव हा पुढे घरी खांडगाव येथे दुपारी आला असता, रघु टकले हा त्यांच्या घराजवळील शेतामध्ये घास कापत होता. त्यावेळी विकास यास आमचे घराचे दोन्ही खोल्यांची कुलपे तुटलेली दिसली. त्यानंतर विकास याने घरात जावून पाहिले असता घरातील सामान अस्ताव्यस्त झालेले दिसून आले. राखणदार टकले याच्याकडे चौकशी केली असता त्यांनी दुपारी तीन वाजल्याच्या सुमारास घास कापण्यासाठी गेल्याचे सांगितले.
त्यानंतर विकास याने खात्री केली असता कपाटाचे दरवाजे उचकटून आतील लॉकर उचकटलेले व अस्ताव्यस्त झालेले दिसले. त्यावरुन मुलाने फोन करुन घरात चोरी झाल्याबाबत सांगितले. त्यानंतर श्रीगोंदा पोलिस स्टेशनला घरी चोरी झाल्याबाबत कळविल्याने पोलिस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी यांनी आमचे घरी भेट देवून पाहणी केली. त्यावेळी जाधव यांनी घरात जावून खात्री केली असता 70 हजार रोख रक्कम, 50, हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने त्यात सोन्याचे नेकलेस,सोन्याची पोत व कर्णफुले, नथ असा एकूण 1 लाख 20 हजार रुपये किमतीचा ऐवज चोरुन नेला. या प्रकरणी श्रीगोंदा पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्याविरोधात घरफोडीच्या गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास पोलिस उप निरीक्षक दिलीप तेजनकर करीत आहेत.

COMMENTS