खडसे यांची ईडीकडून चौकशी ; राजकीय हेतूने कारवाई होत असल्याचा आरोप

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

खडसे यांची ईडीकडून चौकशी ; राजकीय हेतूने कारवाई होत असल्याचा आरोप

मुंबई : भोसरी जमीन घोटाळाप्रकरणी ईडीने पुन्हा कारवाई करत राष्ट्रवादी काँगे्रसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या जावयाला अटक केल्यानंतर खडसे यांना समन

खडसेंना संपविण्यासाठी ईडीची कारवाई : राज ठाकरे
जावयापाठोपाठ खडसे आणि मंदाकिनी खडसेंनाही अटकेची शक्यताl पहा LokNews24
एकनाथ खडसे यांची प्रकृती स्थिर, रुग्णालय प्रशासनाने दिली माहिती

मुंबई : भोसरी जमीन घोटाळाप्रकरणी ईडीने पुन्हा कारवाई करत राष्ट्रवादी काँगे्रसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या जावयाला अटक केल्यानंतर खडसे यांना समन्स बजावत ईडीसमोर गुरूवारी हजर राहण्यास सांगण्यात आले होते. खडसे ईडीसमोर हजर राहणार का, असे प्रश्‍न उपस्थित होत असतांनाच, खडसे गुरूवारी ईडीच्या कार्यालयात हजर राहात चौकशीला सामौरे गेले.
ईडीच्या कार्यालयात दाखल होण्यापूर्वी माध्यमांना सामौरे जातांना खडसे म्हणाले की, ईडीची ही कारवाई राजकीय हेतूने प्रेरित आहे. ’मी या तपासाला संपूर्ण सहकार्य करीन. संपूर्ण महाराष्ट्र हे पाहत आहे, की हा काय प्रकार सुरु आहे. एसीबीने या प्रकरणी आधीच पुरावा नसल्याचा एक अहवाल सादर केला आहे. यापूर्वी माझी 5 वेळा चौकशी झाली. आता पुन्हा होत आहे. राजकीय हेतूने ही कारवाई केली जात असल्याचे खडसे म्हणाले.
बुधवारी खडसेंना ईडीने समन्स बजावले होते. खडसे यांना गुरुवारी (ता. 8) सकाळी 11 वाजता हजर राहण्यास सांगितले होते. खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना ‘ईडी’ने बुधवारी सकाळी अटक केली होती. विशेष न्यायालयाने त्यांना 12 जुलैपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. एकनाथ खडसे महसूलमंत्री असताना त्यांची पत्नी आणि जावयाने भोसरी येथे एमआयडीसीसाठी संपादीत केलेला भूखंड खेरदी केला होता. यावरून त्यांना मंत्रीपदाचा राजीनामा देखील द्यावा लागला होता.
भोसरी येथे सर्व्हे क्र. 52 हिस्सा 2 अ/2 या मिळकतीवरील 21 आर या जमिनीची मूळ मालकी अब्बास रसुलभाई उकानी (रा. कोलकता) यांच्या नावाने आहे. यामध्ये सलमा सौफुद्दीन वाना, बानुबेन फिरोजभाई पटेल यांच्यासह इतर वाटेकरी आहेत. सुमारे 40 वर्षांपूर्वी उकानी यांची जमीन एमआयडीसीने संपादित केली. ती परत मिळावी, म्हणून उकानी यांनी 8 सप्टेंबर 2015 मध्ये हायकोर्टात याचिका केली. मात्र, हायकोर्टाने ती फेटाळून लावली होती. त्यानंतर उकानी यांनी ही 3.1 एकर जमीन खडसे यांची पत्नी आणि जावयाला विकली. उकानी याने एमआयडीसीला या व्यवहाराची कोणतीही पूर्वकल्पना न देता याची खडसे यांची पत्नी आणि जावयाला विक्री केली होती. त्यांनी हा भूखंड 3 कोटी 75 लाख रुपयांना विकला होता. या भूखंडाची किंमत 40 कोटी रुपयांपेक्षा जास्त असताना त्याचे बाजारमूल्य कमी दाखविण्यात आले. नव्या जमीन अधिग्रहण कायद्यानुसार या जमिनीचे मूल्य तब्बल 80 कोटी रुपये झाले आहे. यामुळे एकनाथ खडसे यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून आपल्या कुटुंबियांना लाभ पोहोचवल्याचा आरोप आहे.

COMMENTS