अहमदनगर/प्रतिनिधी : कोणाला दमबाजी करून वा मारहाण करून रोख स्वरुपात पैसे मागण्याचे खंडणीचे प्रकार सर्वश्रुत आहेत. पण एकाने चक्क फोन पे द्वारे खंडणीचे
अहमदनगर/प्रतिनिधी : कोणाला दमबाजी करून वा मारहाण करून रोख स्वरुपात पैसे मागण्याचे खंडणीचे प्रकार सर्वश्रुत आहेत. पण एकाने चक्क फोन पे द्वारे खंडणीचे पैसे मागितले. त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल झाल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
सोशल मीडियावर फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन फोन पे वरुन खंडणी घेतल्याचा प्रकार उघड झाला आहे. राहाता तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन विद्यार्थिनीचा फोटो व्हॉट्सअप ग्रुपवर व्हायरल करण्याची धमकी देवून तिला 10 हजाराची खंडणी मागून त्यापैकी 7 हजार रुपये फोन पे वर खंडणी घेवून धमकी दिली. यातील आरोपी वैभव जगताप याच्यावर आधी बलात्कार व अपहरणाबाबत पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल आहे. याबाबतची माहिती अशी की, संबंधित मुलीच्या वडिलांनी फिर्यादीत म्हटले आहे की, वैभव जगताप याने नातेवाईकांच्या मोबाईलवर एका तरुणाचा व माझ्या मुलीचा फोटो व्हायरल करण्याची धमकी देवून 10 हजार रुपये खंडणी मागितली. तडजोडीअंती मित्राचा मोबाईल नं. 9975850388 या नंबरवर फोन पे द्वारे 7 हजार रुपये घेतले. आणि तुम्ही जर पोलिसात गेले तर तुमच्या परिवाराला संपून टाकील, सगळ्या गावातील व्हॉट्सअप ग्रुपवर फोटो व्हायरल करील, अशी धमकी दिली. या प्रकरणी मुलीच्या वडिलांनी राहाता पोलिसात फिर्याद दिल्यावरुन वैभव विकास जगताप (रा.रामपूरवाडी ता.राहाता) याच्याविरुद्ध राहाता पोलिसात भारतीय दंड विधान कायदा कलम 386, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचा अधिक पोलिस निरीक्षक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार मंडलिक करीत आहेत. दरम्यान, या प्रकाराने राहाता परिसरात खळबळ उडाली आहे. खंडणी मागण्याच्या या प्रकारासंदर्भात दाखल गुन्ह्याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.
COMMENTS