खंडाळा नगरपंचायतीचे 2021 चे स्वच्छ सर्वेक्षणात ओडीएफ प्लस प्लस होण्याचा बहुमान

Homeमहाराष्ट्रसातारा

खंडाळा नगरपंचायतीचे 2021 चे स्वच्छ सर्वेक्षणात ओडीएफ प्लस प्लस होण्याचा बहुमान

स्वच्छ सर्वेक्षण सन 2020 च्या यशस्वी वाटचालीनंतर आता खंडाळा नगरपंचायतने स्वच्छ सर्वेक्षण 2021 मध्ये ओडीएफप्लस प्लस होण्याचा संकल्प केला होता आणि तो पुर्ण ही केला आहे.

माजी ज्येष्ठ मंत्री डॉ. आण्णासाहेब डांगे यांनी बजावला मतदानाचा हकक
एकविरा देवी, राजगडावल लवकरच रोप वे
भिंत कोसळण्याच्या भीतीने बीड नगर परिषदेने लावलेले बॅरिकेट्स लोकांनीच हटविले

लोणंद / वार्ताहर : स्वच्छ सर्वेक्षण सन 2020 च्या यशस्वी वाटचालीनंतर आता खंडाळा नगरपंचायतने स्वच्छ सर्वेक्षण 2021 मध्ये ओडीएफप्लस प्लस होण्याचा संकल्प केला होता आणि तो पुर्ण ही केला आहे. त्या अनुषंगाने पुर्व नियोजित कार्यक्रम राबविण्याच्या दृष्टीने नगरपंचायतीकडून प्रयत्नाना अपेक्षित यश आले आहे. खंडाळा नगरपंचायतीने पहिल्याच प्रयत्नात ओडीएफ प्लस प्लस होण्याचा बहुमान पटकावत मिळविला आहे. सातारा जिल्ह्यातील नगरपंचायतीमध्ये पहिलीच खंडाळा नगरपंचायत ठरलेली आहे. याबद्दल खंडाळा नगरपंचायतीच्या मोहिमेबद्दल नागरिकांकडून विशेष कौतुक ही केले जाते आहे.या मोहिमेत सहभागी होताना नगरपंचातीकडून कृतिशील पाऊले टाकत खंडाळा शहराचे नाव विकासाच्या दृष्टीने तसेच स्वच्छ सुंदर राखण्याचा यशस्वीपणे प्रयत्न होत आहे. सार्वजनिक शौचालय दुरुस्ती व शहर स्वच्छता मोहीम युध्द पातळीवर सुरु आहे. नागरिकांनी स्वच्छ सर्वेक्षण सन 2020 प्रमाणे आता सन 2021 मध्ये ही नागरिकांनी सहकार्य केले आहे. असे खंडाळा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी डॉ. योगेश डोके यांनी म्हटले आहे.

स्वच्छ सर्वेक्षण 2021 ची तपासणी समितीने खंडाळा शहराला भेट दिली आहे. सध्या नगरपंचयतीच्या माध्यमातून घंटागाडीतून विलगीकृत कचरा घरोघरी जाऊन जमा केला जातो आहे. त्यासाठी नागरिकांनी घरातील कचरा घंटागाडीतच टाकावा. आपले शहर स्वच्छ व सुंदर रहाण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे. 

मुख्याधिकारी योगेश डोके यांच्या मार्गदर्शनाखाली सिटी कॉर्डीनेटर अक्षय खलाटे, स्थापत्य अभियंता वैभव बाबर, अजय सोळसकर, मोहन खंडागळे, अक्षय घाडगे, अमोल पवार, रोहित गाडे, दिलीप लांडगे, स्वच्छतादूत संतोष देशमुख यांच्याकडून ही मोहीम राबविण्या विशेष मेहनत घेतलेली असून यशस्वीपणे मोहीम राबविताना या मोहिमेतील प्रयत्नांना यश आले आहे. पहिल्याच प्रयत्नात खंडाळा नगरपंचायत ओडीएफ प्लस प्लस झाली आहे. त्यामुळे माझी वसुंधरा स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत अंदाजे 40 लाख रुपयांपर्यंतचा निधी मिळणार आहे. आता खंडाळा नगरपंचायत जीएफसी 3 स्टार सिटी करण्याचे उद्दिष्ट तसेच स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत सुध्दा चांगला क्रमांक मिळवण्यासाठी खंडाळा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी तसेच नगराध्यक्ष,

उपनगराध्यक्ष, सर्व नगरसेवक, सर्व प्रशासकीय कर्मचारी वर्ग, स्वच्छ सर्वेक्षण शहर समन्वयक तसेच स्वच्छतादूत यांनी ठरवले आहे.

COMMENTS