क्रांतीसिंह नाना पाटील शासकीय रुग्णालयातील चाचणी लॅबची क्षमता वाढवावी : विधानसभा सभापती

Homeमहाराष्ट्रसातारा

क्रांतीसिंह नाना पाटील शासकीय रुग्णालयातील चाचणी लॅबची क्षमता वाढवावी : विधानसभा सभापती

सातारा जिल्ह्यात कोरोना संसर्ग असलेले रुग्ण आढळत आहे. त्यामुळे जे निर्बंध लावले आहेत ते अधिक कडक करावेत.

माळीबाभूळगाव येथील ग्रामपंचायत सदस्य गणेश वायकर यांच्यासह तरुणांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
काय झाडी, काय डोंगर….. अजित पवारांकडून शहाजीबापूंची मिमिक्री
खामगाव जिल्हा परिषद शाळा तालुक्यात प्रथम

सातारा / प्रतिनिधी : सातारा जिल्ह्यात कोरोना संसर्ग असलेले रुग्ण आढळत आहे. त्यामुळे जे निर्बंध लावले आहेत ते अधिक कडक करावेत. तसेच स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्व साधारण रुग्णालयातील आरटीपीसीआर लॅबची क्षमता वाढवून कोरोना टेस्टींगचे प्रमाण वाढवा, अशा सूचना विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात आज कोरोना संसर्ग आढावा बैठक विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी ते बोलत  होते. बैठकीला पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई, खासदार श्रीनिवास पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, आमदार शशिकांत शिंदे, आमदार मकरंद पाटील, आमदार दिपक चव्हाण, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल आदी उपस्थित होते.

तरुणांना जास्त प्रमाणात कोरोना संसर्ग होत आहे. जिल्ह्यातील तरुणांनी शासनाने तसेच प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन करुन विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर पुढे म्हणाले, जो कोणी नियमांचे पालन करणार नाहीत अशांवर कारवाई करावी. रुग्णांची संख्या वाढत आहे कोणताही रुग्ण बेडपासून वंचित राहणार नाही. तसेच रुग्णास सहजपणे बेड उपलब्ध व्हावा, यासाठी प्रशासनाने दक्षता घ्यावी, अशा सूचनाही त्यांनी शेवटी केल्या.

कोरोना संसर्गाचे रुग्ण आढळण्याचे प्रमाण वाढत आहे. रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांची जास्तीत जास्त कोरोना टेस्टींग करावे, अशा सचूना करुन पालकमंत्री पाटील पुढे म्हणाले, शासनाने व प्रशासनाने घातलेल्या निर्बंधाची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. मास्क घालणार नाहीत अशा नागरिकांवर दंडात्मक कारवाई करावी. तसेच लग्न समारंभावर लक्ष ठेवावे. तसेच रात्री 8 नंतर 5 पेक्षा अधिक नागरिक एकत्र येणार नाहीत याचीही दक्षता पोलिसांनी घ्यावी.

लग्न समारंभ, बार, रेस्टॉरंट यांच्यावर पोलीस विभागाच्या माध्यमातून वेळोवेळी तपासणी करण्यात येईल. ज्या ठिकाणी नियमांचे पालन होणार नाही तेथे तात्काळ कारवाई करण्यात येईल, असे ना. देसाई यांनी बैठकीत सांगितले.

स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णलयातील आरटीपीसीआर लॅबची क्षमता वाढविण्यासाठीचा प्रस्ताव द्यावा, या लॅबसाठी केंद्राकडून मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे खासदार श्रीनिवास पाटील बैठकीत सांगितले.

यावेळी आमदार शशिकांत शिंदे, आमदार मकरंद पाटील, आमदार दिपक चव्हाण यांनी सूचना केल्या. बैठकीला अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी उपस्थित होते.

COMMENTS