पुरंदर तालुक्यात ऑक्सिजन, रेमडेसिवरचा तुटवडा असून लसीकरणही थांबले असल्याचा आरोप माजी मंत्री विजय शिवतारे यांनी केला.
पुणे/प्रतिनिधीः पुरंदर तालुक्यात ऑक्सिजन, रेमडेसिवरचा तुटवडा असून लसीकरणही थांबले असल्याचा आरोप माजी मंत्री विजय शिवतारे यांनी केला. रेमडेसिवीरच्या तुटवड्यावरुन ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. कोव्हिड सेंटरमध्ये निकृष्ठ दर्जाचे जेवण दिले जात असल्याची तक्रार करत प्रचंड मोठ्या प्रमाणात ब्लॅक मार्केटिंग सुरू असल्याचा आरोप शिवतारे यांनी केला.
यासंदर्भात जिल्हाधिकार्यांची भेटही घेतल्याची माहिती त्यांनी दिली. महाविकास आघाडीच्या विरोधात माझी भूमिका नाही. प्रशासनाच्या भूमिकेवर माझी नाराजी आहे. जिल्हाधिकारी, तसेच अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कारवाईवर माझा संशय आहे, असे सांगून ते म्हणाले, की पुरंदर तालुक्यात 1800 रुग्ण असताना फक्त 225 रेमडेसिवीर मिळाले आहेत. लसीकरणबाबतीतही आमच्यावर अन्याय झाला आहे. पुरंदरमध्ये जास्त धोका असताना फक्त 34 हजार लसीकरण झाले आहे. जिल्ह्यात अन्यत्र मात्र दुपटीने लसीकरण झाले. सम प्रमाणात सगळ्या गोष्टींचे वाटप करावे अशी मागणी करताना मला राजकारणावर बोलायचे नाही, असेही ते म्हणाले.
COMMENTS