कोविडचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी भाळवणीतील महत्वाचे रस्ते बंद

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोविडचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी भाळवणीतील महत्वाचे रस्ते बंद

भाळवणी (प्रतिनिधी):-  पारनेर तालुक्यातील भाळवणीसह सहा गावे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्या आदेशानंतर लॉकडाउन करण्यात आले असून कोविडचा प्रादुर्

पाथर्डी तालुक्यातील उद्योजकाला खंडणीची मागणी
स्वार्थी राजकारणासाठी ढाकणे कुटुंबीयांनी कधीही आपला स्वाभिमान गहाण ठेवला नाही
डॉ. सुजय विखे यांना संगमनेर तालुका बंदीचा एकमुखी ठराव

भाळवणी (प्रतिनिधी):- 

पारनेर तालुक्यातील भाळवणीसह सहा गावे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्या आदेशानंतर लॉकडाउन करण्यात आले असून कोविडचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी तहसिलदार गणेश अढारी यांच्या मार्गदर्शनाखाली महसुल व ग्रामपंचायतीमार्फत गावठाण हद्दीतील गावात जाणारे सर्व मुख्य रस्ते बांबुच्या सहाय्याने बंद करण्यात आले असून ग्रामस्थांना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

यावेळी महसूल विभागाचे भाळवणी येथील मंडळ अधिकारी दिपक कदम, कामगार तलाठी श्री. कुसमुडे, ग्रामपंचायतीचे कर्मचारी तसेच पारनेर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक घनश्याम बळप यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय  जावळे, पो.ना. एच.बी. माने, श्री. पी.सी. भापसे व इतर कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला. 

COMMENTS