कोरोना संसर्ग कमी करण्यासाठी तालुका प्रशासनाने लवकरात लवकर उपाययोजना राबविण्याबाबत शहर शिवसेनेने शुक्रवार दि.२६ मार्च रोजी तहसीलदारांना निवेदन दिले.
कोपरगाव शहर प्रतिनिधी :
कोरोना संसर्ग कमी करण्यासाठी तालुका प्रशासनाने लवकरात लवकर उपाययोजना राबविण्याबाबत शहर शिवसेनेने शुक्रवार दि.२६ मार्च रोजी तहसीलदारांना निवेदन दिले.
तहसीलदार योगेश चंद्रे यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, तालुक्यात बाधित रुग्णांची संख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रशासन प्रामाणिक प्रयत्न करत आहे. तरी देखील शहर व ग्रामीण भाग मिळून रोज शंभराच्या वर रुग्ण आढळत आहे. सद्यपरिस्थितीत नियंत्रण मिळवण्यासाठी शहराप्रमाणे ग्रामीण भागातही तात्पुरते कोविड सेंटर सुरू करावे, जिल्हा परिषद गटामध्ये प्रत्येकी एक कोविड सेंटर सुरू करावे, ग्राम सुरक्षा दल कार्यान्वित करावे, उपचारांती रुग्ण विलगिकरणात राहतो की नाही याबाबत लक्ष ठेवण्यास ग्राम सुरक्षा समितीला अधिकार द्यावे, मास्क वापरण्यास सक्ती करून विना मास्कवाल्यांकडून दंड वसूल करावा,व्यापारी व भाजीपाला विक्रेत्यांच्या कोविड-19 चाचण्या (मोफत) करून प्रमाणपत्र द्यावे. अशा विविध मागण्या करण्यात आल्या आहेत.
सदर निवेदन उत्तर नगर जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली,तालुकाप्रमुख शिवाजी ठाकरे शहरप्रमुख कलविंदरसिंग दडीयाल,वाहतूक सेना जिल्हाप्रमुख इरफान शेख, उपतालुका प्रमुख रावसाहेब थोरात आदिंनी दिले.
COMMENTS