नवी दिल्ली : कोरोना लसीकरण मोहीमेचा वेग वाढवण्यात आला असला तरी देशभरात कोरोना रुग्ण संख्येचा स्फोेट झाला असून, काल देशभरात एका दिवसांत तब्बज 1 लाख 94
नवी दिल्ली : कोरोना लसीकरण मोहीमेचा वेग वाढवण्यात आला असला तरी देशभरात कोरोना रुग्ण संख्येचा स्फोेट झाला असून, काल देशभरात एका दिवसांत तब्बज 1 लाख 94 हजार नवे रुग्ण आढळून आल्यामुळे आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. तर 24 तासामध्ये तब्बल 442 जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासांत 60,405 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. सध्या देशात कोरोनाचे 9 लाख 55 हजार 319 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर पॉझिटिव्हिटी रेट 11.05 टक्क्यांवर पोहोचला आहे. दरम्यान, देशातील ओमायक्रॉन रुग्णसंख्या 4,868 एवढी झाली आहे. याआधीच्या दिवशी देशात कोरोनाबाधितांच्या वाढीचा आलेख थोडा स्थिरावल्याचे दिसून आले होते. सोमवारी दिवसभरात 1 लाख 68 हजार 63 कोरोनाबाधितांची भर पडली होती. तर, 277 रूग्णांचा मृत्यू झाला होता. मंगळवारी देशाचा कोरोनामुक्तीदर 96.36 टक्के नोंदवण्यात आला होता. पण आता रुग्णसंख्या वाढली असल्याचे दिसून आले आहे. सुरक्षा दलातील जवानांनी कोरोनाची लागण होत आहे. सध्या बीएसएफमधील 729 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. सशस्त्र सीमा दलातील 562 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत 481 निवासी डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती महाराष्ट्र निवासी डॉक्टर संघटनेने दिली आहे. अमरावतीत कोरोनाचा पुन्हा एक नवीन व्हेरीयंट (इ.1.606) आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. विविध राज्यात कडक निर्बर्ंध लादण्यात आल्यामुळे, कोरोना रुग्ण संख्येचा आलेख कमी होईल, अशी अपेक्षा होती. मात्र विविध राज्यात कोरोना रुग्ण संख्येचा आलेख चढताच असल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेत, लसीकरण वाढवण्याच सूचना केल्या होत्या. मात्र तरी देखील कोरोना रुग्णांची संख्या कमी झालेली नाही. मात्र कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असली तरी रुग्णालयात भरती होण्याची आणि ऑक्सिजनची मात्रा कमी लागत असल्याचे एवढेच काय ते सकारात्मक चित्र दिसून येत आहे.
कोरोना उपचारातून ‘मोल्नुपिरावीर’ औषध रद्द
इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या (आयसीएमआर)ने कोरोनावरील उपचार पद्धतीत ‘मोल्नुपिरावीर’ औषधाचा समावेश करू नये, असा निष्कर्ष कोरोनाविषयक राष्ट्रीय टास्क फोर्सने काढला आहे. ‘मोल्नुपिरावीर’च्या अनुषंगाने सुरक्षाविषयक चिंता असल्याचे गेल्या आठवड्यात ‘आयसीएमआर’चे संचालक डॉ. बलराम भार्गव यांनी सांगितले होते. अँटिव्हायरल ड्रग ‘मोल्नुपिरावीर’चा वापर 15 ते 45 वयोगटातील महिला कोरोनाग्रस्तांवर करण्यात येऊ नये, असा इशारा दिला होता.
COMMENTS