कोरोना रुग्ण संख्या थांबता थांबेना

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोरोना रुग्ण संख्या थांबता थांबेना

जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या अजूनही थांबलेली नाही.

बाळासाहेब थोरातांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान
श्रीगोंद्यात कायदेभंग…प्रतिबंधित बीटी वांग्याची होणार जाहीर लागवड
सत्यजीत तांबे यांच्या पाठपुराव्यातून शिर्डी येथे जिल्हा पर्यटन माहिती केंद्र सुरू होणार

अहमदनगर/प्रतिनिधी- जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या अजूनही थांबलेली नाही. दोन दिवसांपासून जवळपास पूर्ण लॉकडाऊनची स्थिती असतानाही कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. बुधवारी 1680 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून, नव्या 1652 बाधितांची रुग्ण संख्येत भर पडली आहे. जिल्ह्यात आता कोरोनातून मुक्त झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 95 हजार 175 इतकी झाली आहे. रुग्ण ब

रे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 88.81 टक्के इतके झाले आहे. रूग्ण संख्येत 1652 ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणार्‍या रुग्णांची संख्या आता 10738 इतकी झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये 458, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 492 आणि अँटीजेन चाचणीत 702 रुग्ण बाधीत आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 141, अकोले 13, जामखेड 16, कर्जत 11, कोपरगाव 35, नगर ग्रामीण 22, नेवासा 3, पारनेर 7, पाथर्डी 24, राहता 27, राहुरी 11, संगमनेर 53, शेवगाव 32,  श्रीगोंदा 1, श्रीरामपूर 9,  कँटोन्मेंट बोर्ड 44, मिलिटरी हॉस्पिटल 5 आणि इतर जिल्हा 4 अशा रुग्णांचा समावेश आहे. खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 155, अकोले 6, जामखेड 1, कर्जत 4, कोपरगाव 56, नगर ग्रामीण 35, नेवासा 4,  पारनेर 6, पाथर्डी 1, राहाता 88,  राहुरी 20, संगमनेर 31, शेवगाव 4, श्रीगोंदा 5, श्रीरामपूर 57, कँटोन्मेंट बोर्ड 3, इतर जिल्हा 15 आणि इतर राज्य 1 अशा रुग्णांचा समावेश आहे. अँटीजेन चाचणीत 702 जण बाधित आढळुन आले. मनपा 66, अकोले 49, जामखेड 29, कर्जत 151, कोपरगाव 8, नगर ग्रामीण 77, नेवासा 58, पारनेर 15, पाथर्डी 63,  राहाता 31, राहुरी 66, शेवगाव 48, श्रीगोंदा 5, श्रीरामपूर 4, कॅन्टोन्मेंट बोर्ड 15 आणि इतर जिल्हा 17 अशा रुग्णांचा समावेश आहे. डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा 433, अकोले 61, जामखेड 37, कर्जत 101,  कोपरगाव 114, नगर ग्रामीण 74, नेवासा 55, पारनेर 60, पाथर्डी 63, राहाता 229, राहुरी 92, संगमनेर 105,  शेवगाव 61,  श्रीगोंदा 37,  श्रीरामपूर 116, कॅन्टोन्मेंट 16, मिलिटरी हॉस्पिटल 14 आणि इतर जिल्हा 12 अशा रुग्णांचा समावेश आहे. बरे झालेली रुग्ण संख्या-95,175. उपचार सुरू असलेले रूग्ण-10,738. मृत्यू-1,255. एकूण रुग्ण संख्या-1,07,168.

COMMENTS