कोपरगाव शहर प्रतिनिधी-कोरोना संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी सर्वांचेच सामुदायिक प्रयत्न गरजेचे असून समाजातील सर्व घटकांतील व स्तरातील विस्कटत चाललेली घडी सुरळीत सुरु ठेवण्यासाठी सर्वांचे एकमत असायला हवे.
कोपरगाव शहर प्रतिनिधी-कोरोना संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी सर्वांचेच सामुदायिक प्रयत्न गरजेचे असून समाजातील सर्व घटकांतील व स्तरातील विस्कटत चाललेली घडी सुरळीत सुरु ठेवण्यासाठी सर्वांचे एकमत असायला हवे. होळीला कोरोनाचा दहन संकल्प करुन सद्भावनेची गुढी उभारुया असे आवाहन सूर्यतेज संस्थापक व समन्वयक सुशांत घोडके यांनी केले आहे.
शिर्डी उपविभागात कोपरगाव तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासन, वैद्यकीय विभाग, खाजगी रुग्ण सेवा देणारे छोटे-मोठे वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर, स्वयंसेवी संस्था, विविध सार्वजनिक मंडळांचे कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत.प्रत्येकाने सामाजिक जबाबदारी समजुन कोरोना नियंत्रणासाठी खालील २१ मुद्यानुसार नागरिकांनी कृती करण्याचे आवाहन सूर्यतेज संस्थापक व समन्वयक सुशांत घोडके यांनी केले आहे.
चला संकल्प करुया…कोरोना संसर्ग नियंत्रणात आणु या…
१) मास्क नियमीतपणे व योग्यरीतीने वापरणे (नाक आणि तोंड झाकुन)…आपण वापरत असलेले मास्क आपणच नियमित स्वच्छ धुऊन निर्जंतुक करावे…
२) काहीही खाणे-पिणे अगोदर हात स्वच्छ (सॅनेटायझर/साबणाने) स्वच्छ धुणे महत्वाचे आहे… तसेच वारंवार हात धुणे महत्वाचे आहे…
३) सार्वजनिक ठिकाणी वावरतांना सुरक्षित अंतर ठेवून वावर करणे… तसेच लग्न,इतर समारंभ अतिशय छोटे व प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करुन होणे आवश्यक आहे…रुग्न जास्त प्रमाणात आढळलेली ठिकाणे तसेच सार्वजनिक इमारती,सर्व प्रशासकीय कार्यालय, सार्वजनिक शौचालय येथे वेळोवेळी स्थानिक स्वराज्य संस्था अथवा स्वयंसेवी संस्था मार्फत नियमितपणे निर्जंतुकीकरण करावे…
४) सार्वजनिक खरेदी/विक्री केंद्रावर प्रमाणापेक्षा जास्त गर्दी होणार नाही या करिता दुकानदाराने ग्राहकांसाठी सुचना फलक लावावे…तसेच दुकानदाराने स्वतः मास्क घालावे व ग्राहकाचे तोंडावर मास्क असल्यावरच प्रवेश द्यावा…ही काळजी भाजी विक्रेते,छोटे-छोटे दुकानदार यांनीही घ्यावी…
५) खाद्य पदार्थ केंद्रावर प्रमाणित आसन व्यवस्थेच्या ५०% नागरिकांची सोय करावयाची आहे…तेथेही हात धुणे… नियमितपणे निर्जंतुकीकरण करुणे महत्त्वाचे आहे…
६) खरेदी विक्री केंद्र, नोकरदार तसेच ज्या नागरिकांचा सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात वावर असतो अशा नागरिकांनी स्वतः आपले कपडे नियमित डिटर्जंट पावडर व पाणी एका बादलीमध्ये दैनंदिन किमान ३-४ तास भिजवावे…नंतर धुवून वाळवावे व २४ तासानंतर ते वापरावे…जेणे करुन आपल्या कपड्यावर सार्वजनिक ठिकाणी आलेला विषाणूची आपल्या कुटुंबियांना बाधा होणार नाही…
७) बाजारात सॅनेटायझरचे अनेक प्रकार आढळून आले आहेत.त्यात मान्यता प्राप्त सॅनेटायझरची खात्री करुन वापरावे… सॅनेटायझरमध्ये पाणी टाकून वापरू नये… सॅनेटायझर नसल्यास साबनाने हात धुवावेत…
८) कुठल्याही आजाराने बाधित रुग्णास रुग्णालयात भेटीसाठी एक नातेवाईक किंवा जिवलग सहकारी व्यतिरिक्त वारंवार भेट टाळावी… मोबाईल,व्हिडिओ कॉल मार्फतही आपला संबंधितांशी उत्तम संवाद होवू शकतो… मात्र रुग्णालयात रुग्णास भेटीला गेलेल्या प्रत्येकाने आपले अंगावरील कपडे डिटर्जंट पावडर आणि पाणी यात भिजविणे महत्वाचे आहे…नंतर धुवून वाळवावे व २४ तासानंतर ते वापरावे…
९) रुग्णालयात उपचारासाठी रुग्णाला सोडल्यावर त्यांचे सोबत आलेल्या नातेवाईक किंवा सहकारी यांनी आपले वाहन रुग्णालयाचे जवळ वाहतूकीला अडथळा येणार नाही या काळजीने मोकळ्या जागेत आपल्या वाहनाची योग्य काळजी घेवून लावावेत…रुग्णास भेटण्यासाठी येणाऱ्या प्रत्येकाने रुग्णालयापासून दूर अंतरावर वाहने लावून पायी चालत यावे…
१०) रुग्णालयाचे प्रवेशद्वाराजवळ अती तातडीचे प्रसंगी रुग्णवाहिका (Ambulance) २४ तास सहजपणे आत-बाहेर ये-जा करु शकल असा मार्ग राहिल याची काळजी नागरिकांनी घ्यावी… शहरातील मुख्य रस्ते येत्या काळात वाहतुकीसाठी कोंडी होणार नाही या पध्दतीने वाहने योग्य ठिकाणी लावावीत… काही कारण नसल्यास वाहने रिकामी फिरवणे टाळावीत… रुग्णवाहिका (Ambulance) चा आवाज आल्यास तीची दिशा समजून प्राधान्य क्रमाने रुग्णवाहिकेचा मार्ग मोकळा करुन द्यावा…
११) शाळा / महाविद्यालय येथे संबंधित शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक यांनी कोरोना संसर्ग बाबत जागरूकता करावी…सर्व नियमांचे पालन करतांना शिक्षणासारखे पवित्र कार्य सुरु ठेवणे महत्त्वाचे आहे…
१२) वैद्यकीय क्षेत्रातील सर्वच मोठ्या-छोट्या डॉक्टरांचे बहुमोल सहकार्य मिळत आहे…कोविड संसर्ग व्यतिरिक्त इतरही आजारांवर रुग्णांना स्वतंत्रपणे उपचार मिळणे गरजेचे आहे…अशा प्रसंगी कोविड-नाॅन कोविड स्वतंत्र व्यवस्थापन महत्त्वाचे आहे… प्रशासनाचे वैद्यकीय विभाग, खाजगी वैद्यकीय व्यवसायिक यांचेत नियमित संवाद महत्वाचा आहे…
१३) गरीब -सर्वसामान्य नागरिकांची अर्थ व्यवस्था डबघाईस येत आहे…अशा कठीण परिस्थितीत रुग्णांचा अनावश्यक खर्च कसा टाळता येईल का? याबाबत आपण आपापले स्तरावर किंवा व्यक्तीगत प्रयत्न करावे…
१४) रुग्ण व त्यांचे नातेवाईक किंवा सहकारी यांनी आपले म्हणणे थोडक्यात डॉक्टरांना सांगावे…जेणेकरून तिष्ठत असलेल्या रुग्णांना उपचारासाठी डाॅक्टरांना वेळ देण्यास मदत होईल… आलेल्या प्रत्येक रुग्ण हा डाॅक्टरांना सारखा असतो… आलेल्या प्रत्येक रुग्णावर उपचार सुरु असतो मात्र वरिष्ठ पातळीवरील डॉक्टरांना येणारे ओळखीचे फोन आणि त्यावरील संवादात व त्यांची मर्जी राखण्यासाठी वेळ घालण्याचा हा कालावधी नाही…हे आपण लक्षात घ्यायला हवे…
१५) रुग्णाला कोरोनाची लक्षणे असल्यास आपल्याला लोक काय म्हणतील असे समजुन या भितीपोटी घरगुती उपचाराला पसंती देत असल्याचे आढळून आले आहे…असे लोक परिस्थिती हाताबाहेर गेल्यावर प्रशासकीय वैद्यकीय किंवा खाजगी डॉक्टर यांचेकडून रुग्णांवर उपचारासाठी अपेक्षा ठेवतात…लोक काय म्हणतील या पेक्षा आपला किंवा रुग्णांचा जीव महत्वाचा आहे हे ध्यानात घ्यायला हवे… प्राथमिक लक्षणे आढळून आलेवर चाचणी करुन पुढील उपचार वैद्यकीय सल्ल्याने घ्यावे… कुटुंबातील सदस्यांनी चाचणी करुन किमान १० दिवस सार्वजनिक ठिकाणी फिरणे टाळून गृह/संस्थानिक विलिनीकरणात थांबावे…
१६) सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने कुठल्याही आजाराने उपचारासाठी किंवा कोरोना चाचणी साठी जातांना डोक्याला टोपी/उपरणे बांधावे.सोबत पिण्याचे पाणी बाटली,आधार ओळखपत्र असावे…
१७) कोरोना संसर्ग बाधिताने कुठलीही लक्षणे नसली तरी वैयक्तिक सल्ल्याने औषधोपचार सुरु ठेवणे महत्त्वाचे आहे… सुरुवातीला सौम्य आजार पुढे बळावू शकतो…कोरोना बाधीत रुग्णाने १४ दिवस सार्वजनिक संपर्क पूर्णपणे टाळून प्रशासनाने सांगितले प्रमाणे घरात/संस्थानिक विलिनीकरण कक्षात थांबावे…
१८) कोरोना हा नाकावाटे हवेतून पसरणारा संसर्ग आहे…यांची साखळी तुटली तरच हा नियंत्रणात येणार आहे…
१९) आवश्यक असेल तरच मास्क लावुन घराबाहेर पडावे.आपणास कोणी व्यक्ती वीना मास्क आढळल्यास त्यास मास्क लावण्यास प्रवृत्त करावे…
२०) कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतल्यावर अनेक नागरिक मास्क न वापरता बिनधास्त फिरताना आढळून आले आहे…लस घेतल्यावर सरासरी ४५ दिवसानंतर शरिरात रोग प्रतिकारक शक्ती तयार होते…प्रत्येकाचे शरीर हे वेगवेगळे आहेत त्यामुळे प्रत्येकाचे शरीरात लस किती परिणामकारक आहे हे आत्ताच सांगणे वैद्यकीय शास्राला कठीण आहे… त्यामुळे लस घेतली तरी मास्क वापरावे…
२१) कोरोना हे संकट आहे…संधी साधून उपद्व्याप वाढविण्यासाठी वेळ नाही…माणुसकीने सर्वांनी समजावून घेवून एकत्र येऊन कोरोना निर्मुलणाची वेळ आहे…आपण काय करतो आणि आपण काहीही केले तरी काही फरक पडणार नाही…असा विचार करु नका…तो जो वरती बसलायं तो कोणत्या जाती-धर्माचा आणि कोणत्या रुपात माहिती नाही…पण एक दिवस गेल्यावर त्याला उत्तर तुम्हालाच द्यायचयं लक्षात असू द्यावे…
असे २१ मुद्या द्वारे लोकांमध्ये जनजागृतीचा छोटा प्रयत्न आहे. सर्वांची साथ मिळाली तर दिवसेंदिवस वाढत चाललेला कोरोना संसर्ग नियंत्रणात येवून जन सामान्यांचे जनजीवन सुरळीत राहण्यासाठी मदत होईल.हा एक प्रयत्न आहे.असे सांगत आपणास व आपल्या परिवारास होळी पौर्णिमेच्या आणि गुढीपाडवा शुभेच्छा दिल्या आहेत…
COMMENTS