कोरोना तपासणीला नकार देत कर्मचाऱ्याला बसमधून पळवले (Video)

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोरोना तपासणीला नकार देत कर्मचाऱ्याला बसमधून पळवले (Video)

नगर-औरंगाबाद रस्त्यावरील कोरोना तपासणी प्रवेश नाक्यावर महापालिकेचे आरोग्य कर्मचारी कोरोना तपासणी करतात. या तपासणीवेळी महानगरपालिकेच्या तपासणीला नकार

सचिव भांगेंचे मागासवर्गीयांचा निधी कपातीमागे षडयंत्र ?
दुधाला प्रतिलिटर 40 रूपये भाव द्या
महापुरुषांची बदनामीच्या निषेधार्थ  हमाल कष्टकऱ्यांनी बाजार समितीसमोर केले निदर्शने

नगर-औरंगाबाद रस्त्यावरील कोरोना तपासणी प्रवेश नाक्यावर महापालिकेचे आरोग्य कर्मचारी कोरोना तपासणी करतात. या तपासणीवेळी महानगरपालिकेच्या तपासणीला नकार देत आरोग्य कर्मचाऱ्याला शिवनेरी बसमध्ये बसवून सेंट्रल बस स्थानकापर्यंत पळवून नेण्यात आले होते. या शिवनेरी बस चालकावर कारवाई करण्यासंदर्भातचा ठराव पुणे आगाराला पाठविण्यात आल्याची माहिती जिल्हा व्यवस्थापक मध्यवर्ती बसस्थानक औरंगाबाद यांनी दिली आहे. प्रवाशांच्या कोरोना चाचणीला नकार देऊन,महानगरपालिकेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांना बसमधून उतरून न देता बस मधील कर्मचाऱ्यांना बळजबरीने मध्यवर्ती बस स्थानकापर्यंत आणण्यात आले होते. त्यानंतर या शिवनेरी बस चालकाविरुद्ध आगार प्रमुखांकडे तक्रार दाखल झाली होती. त्या अनुषंगाने बस चालकाची चौकशी करून निलंबनाचा ठराव औरंगाबाद आगाराच्या वतीने पुणे आगाराला पाठविण्यात आला आहे.

COMMENTS