कोरोनाचा बॉलिवूडलाही चांगलाच फटका बसला आहे.
मुंबई/प्रतिनिधीः कोरोनाचा बॉलिवूडलाही चांगलाच फटका बसला आहे. आता कुठे चित्रपट क्षेत्र सावरायला लागले होते, तर कोरोनाच्या दुसर्या लाटेने पुन्हा उद्योगावर संकट आले आहे. गेल्या तीन महिन्यांत चित्रपटांनी फक्त पन्नास कोटींचा धंदा केला आहे. बॉलिवूडमध्येही कोरोना विषाणूच्या लाटेचा फटका बसला आहे. बॉलिवूड 2000 पासूनच्या सर्वात वाईट टप्प्यातून जात आहे. 2021 चा पहिले तीन महिने संपले आहेत.
या वेळी फक्त रुही चित्रपटाने 25 कोटी रुपये कमावले आहेत. त्यानंतर दुसर्या क्रमांकावर मुंबई सागाचा क्रमांक लागतो, ज्याचे बॉलिवूड कलेक्शन 15 कोटी रुपये आहे. याखेरीज आणखी बरेच चित्रपट आले, ज्यांना दोन कोटी रुपयेही मिळवता आले नाहीत. आतापर्यंत 2021 च्या पहिल्या तिमाहीत बॉक्स ऑफिसवर फक्त 50 कोटी रुपयांचे कलेक्शन झाले आहे. बॉलिवूडच्या इतिहासात आतापर्यंत असे कधी झाले नव्हते. म्हणजेच, नवीन शतकाच्या सुरुवातीपासूनचा हा सर्वात वाईट काळ आहे. यापूर्वी, बॉलिवूडचा सर्वांत वाईट काळ2020 चा पहिला तिमाही काळ होता. त्या तिमाहीतही बॉलिवूड कलेक्शन 780 कोटी रुपये होते. तन्हाजी-अनसंग वॉरियरने 2020 च्या पहिल्या तिमाहीत 280 कोटींची कमाई केली. त्यानंतर, बागी 3, स्ट्रीट डान्सर 3 डी आणि शुभ मंगल झ्यादा सावधान सारख्या चित्रपटांनी 780 कोटींच्या व्यवसायात मुख्य भूमिका निभावली. 2019 चा पहिला तिमाही काळ हा सर्वोत्तम तिमाहीतील एक एक होता. 2019 च्या पहिल्या तिमाहीत उरी – द सर्जिकल स्ट्राइक, केसरी, टोटल धमाल, गल्ली बॉय, लुका चप्पी, मणिकर्णिका द क्वीन ऑफ झांसी आणि बदला यासारखे ब्लॉकबस्टर सिनेमे आले. 2019 च्या पहिल्या तिमाहीत 1103 कोटी रुपयांचा धंदा झाला होता. 2019 च्या पहिल्या तिमाहीची ही मालिका संपूर्ण वर्षभर चालू होती आणि 2019 मध्ये चार हजार चारशे कोटी रुपयांचा गल्ला बॉक्सऑफिसवर जमा झाला होता.
दुर्दैवाने, कोरोना विषाणूच्या साथीमुळे हा व्यवसाय 2020 मध्ये सुरू राहू शकला नाही. 2021 च्या पहिल्या तिमाहीची सुरुवात खराब झाली. दरम्यान, कोरोना विषाणूच्या दुसर्या लाटेमुळे अनेक चित्रपटांचे प्रदर्शन पुढे ढकलले गेले आहे. हिंदी भाषिक राज्यांतील सूर्यवंशी आणि बंटी आणि बबली दोन चित्रपटांचे प्रदर्शन पुढे ढकलले गेले आहे. उत्तर प्रदेश, हरयाणा आणि बंगालमधील सिनेमा हॉलमध्ये नवीन चित्रपटांच्या प्रदर्शनाला शंभर टक्कगे उपस्थितीची परवानगी असूनही प्रदर्शन पुढे ढकलल्याच्या बातम्या आल्या आहेत. रोहित शेट्टी यांनी आपला अक्षय कुमार स्टारर सूर्यवंशी पुन्हा एकदा रिलीज होण्यास स्थगिती दिली आहे. यापूर्वी हा चित्रपट 30 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार होता. तसेच अमिताभ बच्चन, अभिनीत फेस आणि बंटी आणि बबली -2 चे रिलीजदेखील पुढे ढकलले गेले आहे.
दरम्यान, सलमान खानने असेही म्हटले आहे, की कोरोनामुळे महाराष्ट्रात घातलेल्या निर्बंधांमुळे त्यांचा राधे-तुम्हारा मोस्ट वांटेड भाईचा नवीन चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर पडू शकते. सध्या त्याची रिलीजची तारीख 13 मे आहे. म्हणजेच आगामी ईद. फेसबुक लाइव्ह सत्रादरम्यान सलमान खान म्हणाले, की कोरोनाची प्रकरणे कमी होतील, तेव्हाच राधे 13 मे रोजी थिएटरमध्ये येऊ शकेल.
जूनपासून चित्रपटगृहे सुरू होण्याची शक्यता
बॉलिवूडसाठीही काही चांगल्या बातम्या येत आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे, की मेपासून कोरोनाची स्थिती सुधारण्यास सुरुवात होईल. लसीकरण मोहिमेमुळे जूनपर्यंत या उद्योगात सुधारणा होण्याची अपेक्षा आहे. जूनपर्यंत 25 टक्के मर्यादेसह थिएटर पुन्हा उघडणे अपेक्षित आहे. सध्या सर्वांचे लक्ष दुसर्या तिमाहीकडे आहे. लोकांना आशा आहे, की जूनपासून परिस्थिती सुधारण्यास सुरुवात होईल आणि 2021 हे मागील वर्ष 2020 च्या तुलनेत चांगले असेल.
COMMENTS