Homeमहाराष्ट्रअहमदनगर

कोरोना अहवाल उशिरा येताय म्हणून रुग्णसंख्येत भरमसाठ वाढ : कोल्हे

कोपरगाव शहर व तालुक्यातील गावांमध्ये रूग्णसंख्या झपाटयाने वाढत असून नागरीकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे, संशयीत रूग्णांच्या चाचणीचा उशीरा येणारा अहवाल आणि विलगीकरण होत नसल्याने रूग्णांची संख्येत वाढ होत आहे.

गुन्हेगार बसले दिमाखात शैक्षणिक दालनात
पढेगावच्या शिंदे दाम्पत्याचे तीन तासाच्या अंतराने निधन
राज्यमंत्री आदिती तटकरे यांचा समाजभूषण, कर्तव्यसंपन्न ‘लेकीचा’ सन्मान सोहळा संपन्न

कोपरगाव शहर प्रतिनिधी- कोपरगाव शहर व तालुक्यातील गावांमध्ये रूग्णसंख्या झपाटयाने वाढत असून नागरीकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे, संशयीत रूग्णांच्या चाचणीचा उशीरा येणारा अहवाल आणि विलगीकरण होत नसल्याने रूग्णांची संख्येत वाढ होत आहे.
त्यामुळे  तातडीने विलगीकरण कक्षाची व्यवस्था करून कोरोना विषाणूचा होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सचिव, माजी आमदार सौ स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे यांनी राज्याचे आरोग्यमंत्री ना.राजेशजी टोपे यांचेकडे केली आहे.
कोपरगाव तालुक्यातील वाढती रूग्णसंख्या ही चिंताजनक ठरत असुन त्यासाठी  कठोर पाउले उचलण्याची गरज असल्याचे सौ कोल्हे यांनी ना राजेशजी टोपे यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला  म्हणून सुरळीतपणे सुरू असलेले जनजीवन पुन्हा विस्कळीत झालेले असुन दिवसागणिक रूग्ण वाढत आहे. प्रशासनाकडून मोठया प्रमाणात जनजागृती होत आहे,मात्र अपु-या सुविधांमुळे रूग्णसंख्येत वाढ होत आहे, त्यामध्ये प्रामुख्याने संशयित रूग्णाची तपासणी केल्यानंतर अहवाल येण्यास ४-५ दिवसाचा कालावधी लागतो, या विलंबाच्या काळात सदरचा संशयित रूग्ण हा समाजव्यवस्थेच्या संपर्कात येतो, तसेच घरी न थांबता फिरत असल्याने अनेकांशी संपर्क येतो, त्यामुळे रूग्णसंख्या झपाटयाने वाढत आहे. वास्तविक संशयित रूग्णास तातडीने विलगीकरण कक्षात ठेवणे आवश्यक आहे. 
परंतू ती सुविधाच नसल्याने तालुका व शहरभर रूग्णसंख्येच्या आकडयात दिवसेंदिवस भर पडत असल्याने कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेउन कोपरगाव विधानसभा मतदार संघात विलगीकरण कक्ष उभारावेत, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात, म्हणजे सामान्य नागरीकांच्या जीवितास होणारा धोका टळेल,तसेच वाढती रूग्णसंख्या घटण्यास मदत होईल, असेही सौ कोल्हे यांनी पत्रात म्हटले आहे.

COMMENTS