कोरोनाच्या संकट काळात ‘ संजीवनी’ ने उचलले मोलाचे पाऊल

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोरोनाच्या संकट काळात ‘ संजीवनी’ ने उचलले मोलाचे पाऊल

दिवसेंदिवस कोपरगांव मधील कोरोनाची परिस्थिती अतिशय गंभीर होत चालेली आहे.

अगस्तीच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त स्मरणिका होणार प्रकाशित
वीस खेळाडूंनी पटकावले सुवर्णपदक
नगरमध्ये विकले जाते नकली रेमन्ड कापड…गुन्हा दाखल

कोपरगांव शहर प्रतिनिधी:- दिवसेंदिवस कोपरगांव मधील कोरोनाची परिस्थिती अतिशय गंभीर होत चालेली आहे. कोरोनाच्या रुग्णांसाठी बेड मिळेना तर कोणाला आॕक्सीजन देखील मिळेना त्या पाठोपाठ इंजेक्शन देखील मिळत नसल्याने रुग्णांना उपचार घ्यायचे तरी कुठ हा प्रश्न उपस्थितीत होताच तालुक्यातील सर्वच परिस्थिती बघता अहमदनगर जिल्हा सहकारी बंँकेचे संचालक विवेक बिपीनदादा कोल्हे यांनी ५०० बेड असलेले कोविड सेंटर सुरु करण्याचा निर्णय घेतला असुन येत्या दोन दिवसांतच आत्मा मालिक इंग्लीश मिडीयम स्कुल वस्तीगृह कोकमठाण या ठिकाणी कोविड सेंटर सुरु होणार असल्याने रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना दिलासा मिळणार आहे. 

मागील वर्षी आलेल्या कोरोना संकटापेक्षा यावर्षी आलेली कोरोनाची दुसरी लाट अतिशय गंभीर आहे. त्यामुळे जास्त खबरदारी घेणे गरजेचे आहे. कोरोना ला हद्दपार करण्यासाठी संजीवनी ने सुरुवातीपासुनच विविध उपाय योजना राबविलेल्या आहेत. त्यात प्रामुख्याने नगरपरिषदेचे आरोग्य व स्वच्छता विभागाचे कर्मचारी यांना सुरक्षा साधणे वाटप, सॅनीटायझर, मास्क, आरोग्य उप केंद्राना औषध फवारणीसाठी सोडीयम हायपोचा पुरवठा, कोरोना रुग्णांना जेवन, शासनाने जाहिर केलेल्या लाॅकडाऊन काळात प्रवासी स्थलांतरीत  नागरिकांना बसेस च्या माध्यमातुन प्रवासाची सुविधा, रिक्षा चालकांना किरणा वाटप, कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची व्यवस्था, कोरोना महामारी बद्दल जनजागृती तसेच दोन रुग्णवाहिका नागरिकांसाठी विना मोबदला अशा विविध समाज उपयोगी उपक्रमां पाठोपाठ आता आत्मा मालिक इंग्लीश मिडीयम स्कुल वस्तीगृह कोकमठाण या ठिकाणी ५०० बेड चे कोविड सेंटर सुरु करण्याचा निर्णय घेवुन संजीवनीने नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने मोलाचे पाऊल उचलल आहे. संजीवनी च्या निर्णयामुळे अनेक रुग्णांच्या गैरसोय टळणार आहे. या कोविड सेंटरच्या माध्यमातुन अनेक रुग्णांना दिलासा मिळणार असुन संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, माजी आमदार सौ. स्नेहलता बिपीनदादा कोल्हे आणि कोपरगांव तालुका आद्यौगिक वसाहतीचे चेअरमन, अहमदनगर जिल्हा सहकारी बंॅकेचे संचालक विवेक बिपीनदादा कोल्हे यांच्या माध्यमातुन उपलब्ध होत असलेल्या आरोग्य सुविधेचा नागरिकांना संकट काळात कोविड सेंटरचा मोठा आधार मिळणार आहे. नव्याने सुरु होणारे कोविड सेंटर ची पाहणी करण्यात आली यावेळी कोपरगाव तहसिलदार योगेश चंद्रे, जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे, सचिन सुर्यवंशी , डाॕ. संकेत पोटे, संजीवनी तोडकर, स्वच्छता दुत सुशांत घोडके यावेळी उपस्थितीत होते.

COMMENTS