कोपरगाव प्रतिनिधी : विश्वावर आलेल्या कोरोना संकटामुळे अर्थव्यवस्था काहीशी अडचणीत आल्यामुळे त्याचा परिणाम काही अंशी विकासकामांना निधी मिळण्यास होत होत
कोपरगाव प्रतिनिधी : विश्वावर आलेल्या कोरोना संकटामुळे अर्थव्यवस्था काहीशी अडचणीत आल्यामुळे त्याचा परिणाम काही अंशी विकासकामांना निधी मिळण्यास होत होता. मात्र सत्ताधारी पक्षाचा आमदार असल्याच्या संधीचा फायदा घेत कोरोनाच्या संकटाचा परिणाम विकासावर होवू दिला नाही, दीडच वर्षात रस्त्याचा अनुशेष भरून काढण्यासाठी प्रतिकूल परिस्थितीत रस्त्यांसाठी कोट्यावधींचा निधी आणला असे प्रतिपादन आ. आशुतोष काळे यांनी केले.
कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथे २ कोटी ७० लक्ष निधीतून करण्यात येणाऱ्या नाशिक जिल्हा हद्द ते पोहेगाव बु. (रा. मा. ६५) ते तालुका हद्द सावळीविहीर रस्ता (प्रजिमा ९८) व २४ लक्ष निधीतून करण्यात येणाऱ्या स्मशानभूमी ते पाटील मळा आदी रस्त्यांच्या डांबरीकरण कामाचे भूमिपूजन आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते पार पडले याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोकराव रोहमारे होते. आमदार आशुतोष काळे पुढे म्हणाले की, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होताच मतदार संघाच्या विकासासाठी जास्तीत निधी कसा आणता येईल यासाठी प्रामाणिक प्रयत्न करून वेळोवेळी विविध खात्याच्या मंत्र्यांच्या भेटी घेवून सहा महिन्याच्या आत अनेक कामे मार्गी लावले. मात्र मार्च २०२० पासून कोरोना संसर्ग रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा परिणाम सरकारच्या तिजोरीवर झाला होता.अशा परिस्थितीत एकीकडे कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी उपाय योजना करायच्या तर दुसरीकडे मतदार संघाचा विकास साधायचा अशी तारेवरची कसरत करून मतदार संघाच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी मिळविण्यात यश मिळाले आहे. यापुढील काळात आशियायी बँकेच्या माध्यमातून झगडे फाटा ते वडगाव पान फाटा,देर्डे फाटा ते भरवस फाटा या रस्त्यासाठी व पोहेगाव बु. (रा.मा. ६५) ते तालुका हद्द सावळीविहीर रस्ता (प्रजिमा ९८) हा रस्ता ओलांडणाऱ्या गोदावरी उजव्या कालव्यावरील पुलासाठी निधी मिळविण्यासाठी पाठपुरावा सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.श्री क्षेत्र मयुरेश्वर देवस्थानास “क” वर्ग दर्जा मिळवून दिला असून भविष्यात या देवस्थानाच्या विकासासाठी भरीव निधी उपलब्ध करून देवू अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी श्री क्षेत्र मयुरेश्वर देवस्थानला “क” वर्ग दर्जा मिळवून दिल्याबद्दल ट्रस्टच्या वतीने व दादा शहाजी रोहमारे सोसायटी व ग.र.औताडे पाटील विद्यालयाच्या वादात यशस्वी मध्यस्थी करून संरक्षक भिंत बांधण्याचा योग्य तोडगा काढून हा वाद कायमस्वरूपी मिटविल्याबद्दल रोहमारे सोसायटीच्या वतीने आ.आशुतोष काळे यांचे आभार व्यक्त करून त्यांचा सत्कार केला.
याप्रसंगी सभापती सौ. पौर्णिमा जगधने, उपसभापती अर्जुनराव काळे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम, संचालक सुनील शिंदे, राजेंद्र घुमरे,आनंदराव चव्हाण, काकासाहेब जावळे एम.टी. रोहमारे, रोहिदास होन, राहुल रोहमारे, राहुल जगधने, नंदकिशोर औताडे, केशवराव जावळे, विठ्ठलराव जावळे, किसनराव पाडेकर,जवळकेचे सरपंच बाबुराव थोरात,देर्डेचे सरपंच योगीराज देशमुख, प्रमोद जावळे, वसंतराव आभाळे, शंकरराव चव्हाण, बापूराव वक्ते, पाटीलबा वक्ते, कृष्णा शिलेदार, कल्याण गुरसळ, रामनाथ घारे, बाळासाहेब घुमरे, नितीन शिंदे, राजेंद्र औताडे, वाल्मीक नवले, निवृत्ती शिंदे, मधुकर औताडे, नरहरी रोहमारे, देवेन रोहमारे, भाऊसाहेब सोनवणे, वसंत पाचोरे, जनार्धन पाचोरे, संदीप रोहमारे, जयंतराव रोहमारे, बाबासाहेब औताडे, रघुनाथ देवडे, संजय रोहमारे, माधवराव गायकवाड, महेंद्र वक्ते, दिलीप रोहमारे, गोकुळ पाचोरे, सतिश पवार, ज्ञानेश्वर पवार, घारीचे सरपंच रामदास जाधव, कौसरभाई सय्यद, दिलीप जुंधारे, बाळासाहेब औताडे, गंगाराम औताडे, भाऊसाहेब सोनवणे, दिपक रोहमारे, सुनील रोहमारे, संतोष वाके, राजेंद्र पाचोरे, उपकार्यकारी अभियंता प्रशांत वाकचौरे, एस.एस.पटेल आदींसह पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते.
जिल्ह्यात साखर कारखानदारीचे तज्ञ म्हणवून घेणाऱ्यांना आपले कारखाने तोटामुक्त करता आले नाही ते काम आ. आशुतोष काळे यांनी करुन दाखविले एवढेच नाही तर कामगारांना बोनस देवून नियमितपणे पगार देखील वेळेवर होत आहे याची नोंद खुद्द शरदचंद्रजी पवारांनी घेतली आहे. विरोधकांनीही केलेल्या चांगल्या कामाचे तोंडभरून कौतुक करणे हा गुण प्रत्येकात नसतो. केवळ सुशिक्षित व सुसंस्कृत व्यक्तिमत्वामध्येच हा गुण असतो असे व्यक्तिमत्व आ.आशुतोष काळे यांचे असून त्यांच्या रूपाने तालुक्याला मोठ्या मनाचा आमदार लाभला आहे. त्यांच्या कामाची कार्यपद्धती पाहता आ.आशुतोष काळे हे कर्मवीर शंकररावजी काळे यांची प्रतिकृती आहे. त्यामुळे विरोधकांना देखील त्यांना विरोध कसा करायचा हे समजत नसून विरोधासाठी विरोध न करता चांगल्या कामाला देखील विरोध करणे हा विरोधकांचा एकमेव एककलमी कार्यक्रम सुरु आहे.
अशोकराव रोहमारे (अध्यक्ष को.ता. एज्यु.सोसायटी)
COMMENTS