कोरोनाची तिसरी लाट ऑगस्टमध्ये ?

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोरोनाची तिसरी लाट ऑगस्टमध्ये ?

मुंबई : देशभरात कोरेानाची दुसरी लाट ओसरत असली तरी कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचा धोका कायम आहे. देशात कोरोनाची तिसरी लाट पुढच्याच महिन्यात येईल लवकर असा

वगळण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या शेतीची पाहणी व पंचनामे करण्यात येणार : महसूल मंत्री बाळासाहेब थोरात
मशीराने धरला रमजानचा उपवास
संजय राऊतांकडून राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची पाठराखण – प्रविण दरेकर

मुंबई : देशभरात कोरेानाची दुसरी लाट ओसरत असली तरी कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचा धोका कायम आहे. देशात कोरोनाची तिसरी लाट पुढच्याच महिन्यात येईल लवकर असा अंदाज एसबीआयने आपल्या अहवालात व्यक्त केला आहे. सप्टेंबर महिन्यात कोरोना स्थिती बिकट असेल असा अंदाज देखील या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे.
कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी प्रशासनाला आणखी सज्ज राहावे लागणार आहे. तसेच येत्या दिवसात लसीकरणावर जोर द्यावा लागणार आहे. यापूर्वी एसबीआयने आपल्या अहवालात करोनाच्या दुसर्‍या लाटेबाबत भाकीत वर्तवले होते. त्यानुसार भारतात दुसर्‍या लाटेची स्थिती जाणवली होती. अहवालात 7 मेपासून करोना रुग्णांची संख्या वाढेल असे सांगण्यात आले होते. त्यानुसार देशात करोनाची दुसरी लाट एप्रिल महिन्यात सुरु झाली आणि मे महिन्यात करोना रुग्णसंख्येत वाढ झाली. या लाटेत दिल्ली, महाराष्ट्र, केरळ या राज्यांना सर्वाधिक झळ पोहोचली. सध्याच्या अहवालानुसार जुलैच्या दुसर्‍या आठवड्यात जवळपास 10 हजार रुग्ण आढळून येतील. तर ऑगस्टच्या दुसर्‍या पंधरवड्यात ही संख्या वाढलेली असेल, असे एसबीआयच्या अहवालात सांगण्यात आले आहे. तिसर्‍या लाटेचा प्रभाव 98 दिवसांपर्यंत जाणवेल असे सांगण्यात आले आहे. दुसर्‍या लाटेच्या तुलनेत तिसर्‍या लाटेत सर्वाधिक लोकांना करोनाची लागण होईल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. देशातली गेल्या 24 तासातली करोना रुग्णांची आकडेवारी आरोग्य मंत्रालयाने नुकतीच जाहीर केली आहे. हे आकडे दिलासादायक असल्याने देशातली करोनाची दुसरी लाट हळूहळू ओसरत असल्याचे दिसून येत आहे.

COMMENTS