Homeताज्या बातम्या

कोरठण खंडोबा गडावर 14 जूनला वटपौर्णिमा महोत्सव

 नगर- राज्यस्तरीय 'ब 'वर्ग तीर्थक्षेत्र आणि लाखो भावीक भक्तांचे कुलदैवत व श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र कोरठण खंडोबा देवस्थान पिंपळगावरोठा, 

कालिचरण महाराजांना उमेदवारी दिली तर…
बीडचे पालकमंत्री धनुभाऊंच्या मुजोर ठेकेदाराने पैठण-पंढरपुर राष्ट्रीय महामार्गाची वाट लावली
पिंपरी चिंचवडमध्ये चौघांचा होरपळून मृत्यू

 नगर- राज्यस्तरीय ‘ब ‘वर्ग तीर्थक्षेत्र आणि लाखो भावीक भक्तांचे कुलदैवत व श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र कोरठण खंडोबा देवस्थान पिंपळगावरोठा, ता पारनेर  या देवस्थानचा ज्येष्ठ पौर्णिमा(वटपौर्णिमा) महोत्सव मंगळवार दिनांक १४ जून २०२२ रोजी भक्ती भावाने संपन्न होणार आहे.पुणे,अहमदनगर,ठाणे,मुंबई,नाशिक,बीड जिल्ह्यातून हजारो खंडोबा भक्तांची कुलदैवताच्या चरणी दर्शनासाठी गर्दी होणार असून त्या पद्धतीने देवस्थान कडून नियोजन चालू आहे.  सकाळी ६.०० वाजता श्री खंडोबा मंगल स्नान पूजा,मूर्ती साजशृंगार स. ७.०० वाजता महाअभिषेक पूजा आरती होऊन भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुले होईल. स. ९.३० वाजता देवाच्या उत्सवमूर्ती ची पालखीतून सवाद्य मिरवणूक कोरठणगड प्रदक्षिणासाठी प्रस्थान करील ढोल लेझीमच्या तालावर पालखीची  भावीक  भक्तांसह सवाद्य मिरवणूक होऊन लंगर तोडणे विधी झाल्यावर पालखीला पोर्णिमा अन्नदाते यांच्यावतीने महाप्रसाद नैवद्य अर्पण होईल .

खोबरे भंडाराची मनसोक्त उधळण करीत येळकोट येळकोट जय मल्हार च्या जयघोषाने कोरठण  गड दुमदुमत राहील. पालखी मंदिरात परतल्यावर सर्व भाविकांना पौर्णिमा महाप्रसादाचे वाटप करण्यात येईल. सालाबाद प्रमाणे पोपट देवराम घुले, अशोक अनंत शिंदे (डोंबिवली),कुशाबा खोसे ,यांच्यावतीने महाप्रसाद अन्नदान होईल. श्री कोरठण खंडोबा मंदिर परिसरातील देवस्थानच्या सर्व इमारती वास्तूंना नवीन रंग काम केल्याने नवी झळाळी उठून दिसत आहे. शासनाच्या पर्यटन क्षेत्र विकास योजनेतून झालेल्या विकास कामांमुळे देवस्थांनचा परिसर सुशोभित व नयनरम्य वाटत आहे .यात्रेतील बैलगाडे घाट निर्मितीसाठी बैलगाडे मालक,जमीन मालक,बैलगाडे प्रेमी,शेतकरी,भाविक भक्त,ग्रामस्थांनी सुरक्षित जागा निश्चित करून देवस्थानला बैलगाडे घाटासाठी जमीन जागा दान करावी असे, निवेदन देवस्थान तर्फे अध्यक्ष अँड पांडुरंग गायकवाड,उपाध्यक्ष गंगाराम बेलकर,सचिव महेंद्र नरड सहसचिव मनीषा जगदाळे,खजिनदार हनुमंत सुपेकर,विश्वस्त किसन धुमाळ ,चंद्रभान ठुबे,अमर गुंजाळ ,अश्विनी थोरात,मोहन घनदाट,किसन मुंढे,बन्सी ढोमे,दिलीप घोडके,साहेबा गुंजाळ,देविदास क्षीरसागर,ग्रामस्थ यांनी केले आहे.

COMMENTS